जिल्हयात शुक्रवारी सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता मोहिम

0
14

स्वच्छ भारत ग्रामीण अंतर्गत उपक्रम

सोलापूर – जिल्ह्यात ODF plus ला गती देणे साठी राबविणेत येणारे विशेष स्वच्छता अभियान अंतर्गत उद्या शुक्रवार दि. २५ आॅगष्ट रोजी सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता मोहिम हाती घेणेत येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. सोलापूर जिल्हात जलस्त्रोतांची संख्या 9756 असून ज्या ठिकाणी जलस्त्रोताचा परिसर खराब आहे. अशा ठिकाणी या अभियान अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम राबविणेत येत आहे.

या जलस्त्रोताच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थ व कर्मचारी सहभागी होत आहेत. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे साठी प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सक्त सुचना दिलेल्या आहेत. जलस्त्रोताचे परिसर स्वच्छ केलमुळे जलस्त्रोत बाधीत होणार नाही. याची काळजी घेणेचा उद्देश्य या अभियानाचा आहे. गावात जलस्त्रोताचे बाजूस कुठल्याही प्रकारे कचरा किंवा घाण त चे सांडपाणी त्यात मिसळणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे. श्रमदानातून ही मोहिम हाती घेणेत येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता या मोहिमेत करणेत येत आहे. स्त्रोताच्या जवळ शौचालय/गाई गुरांचा गोठा नसावा. स्त्रोताच्या जवळ सांडपाणी साचून राहू नये याची काळजी या मोहिमेत घेणेत येत आहे.

जलस्त्रोत स्वच्छ ठेवा- जिल्हाधिकारी तथा सिईओ मनिषा आव्हाळे

सोलापूर जिल्हयात हातपंप, विहीरी तसेच जिथे पिणेचे पाण्याचा वापर ज्या जलस्त्रोता मधून केला जातो असे सर्व जलस्त्रोताचा परिसर स्वच्छ ठेवा. असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले आहे. या विशेष स्वच्छता अभियानात सहभागी व्हा. या जलस्त्रोताची नियमित तपासणी केली जाते. याची सर्वानी काळजी घ्यावी असेही आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी आव्हाळे यांनी केले आहे.