• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’ राष्ट्रनिर्मितीचा आदर्श मार्ग: पांडुरंग बलकवडे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 6, 2026
in Blog
0
छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’ राष्ट्रनिर्मितीचा आदर्श मार्ग: पांडुरंग बलकवडे
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्याची स्थापना केली नाही, तर कृषी, सामाजिक, आर्थिक, लष्करी, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रांत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणत भारतीय इतिहासात ‘अष्टक्रांती’ घडविली. शिवरायांच्या या क्रांतिकारी कार्याचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’ राष्ट्रनिर्मितीचा आदर्श मार्ग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बलकवडे हे बोलत होते. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, हिंदकेसरी पैलवान महेंद्र गायकवाड, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील, प्रा. देवानंद चिलवंत, समन्वयक डॉ. अनिल घनवट यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यासन केंद्राचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा ऐतिहासिक संदर्भांसह उहापोह केला. त्यांनी सांगितले की, शिवरायांनी अन्याय, अत्याचार आणि परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करत स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवत त्यांनी पारदर्शक आणि जबाबदार शासनव्यवस्था निर्माण केली. स्त्री सन्मानाचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण, सशक्त आरमाराची उभारणी, किल्ल्यांचे जाळे, सक्षम गुप्तचर व्यवस्था, धार्मिक सहिष्णुता आणि न्यायनिष्ठ कारभार या माध्यमातून त्यांनी आधुनिक राष्ट्रकारभाराचे आदर्श निर्माण केले. त्यांच्या चरित्रातून राम आणि कृष्णाचा संगम दिसून येतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘छत्रपती शिवरायांची अष्टक्रांती’ या विषयावर बोलताना त्यांनी शिवरायांच्या कार्यामुळे भारतीय समाजात निर्माण झालेल्या आत्मविश्वासाची जाणीव करून दिली.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. छत्रपती शिवरायांची ‘अष्टक्रांती’मधून विद्यापीठाला भरपूर काही घेण्यासारखे आहे. विद्यापीठाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ राहून काम करू, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल घनवट यांनी केले. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित या विशेष व्याख्यानाला विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous Post

जय भोलेनाथ मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Next Post

बहिणीला पोटगी नाकारणाऱ्या भावजीच्या खुनाच्या आरोपातून मेव्हण्यासह दोघे निर्दोष

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
बहिणीला पोटगी नाकारणाऱ्या भावजीच्या खुनाच्या आरोपातून मेव्हण्यासह दोघे निर्दोष

बहिणीला पोटगी नाकारणाऱ्या भावजीच्या खुनाच्या आरोपातून मेव्हण्यासह दोघे निर्दोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026