• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
May 22, 2026
in मुख्य बातमी
0
बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील
0
SHARES
22
VIEWS

बकरी ईद सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे

सोलापूर – बकरी ईद हा सण दि. २७ मे २०२६ रोजी साजरा होत असून दि. २७ ते दि. २९ मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी-विक्री होणार आहे. यासाठी बाजार भरविण्यात येणार असून जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी म्हटले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बकरी ईद 2026 निमित्त महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 1976 व महाराष्ट्र प्रार्य रक्षण सुधारणा कायदा 1995 च्या अमलबजावणीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत निवासी जिल्हाधिकारी श्री. पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुऱ्हाण, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. अनिल तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अत्तिक मुलानी, महापालिकेचे मंडई नियंत्रण अधिकारी तपन डंके, पशुसंवर्धन चे डॉ. डी. ए. गिड्डे, सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी हबीब भाई नदाफ, हाजी कुरेशी, इस्माईल पठाण आदी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले की सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या सूचना तसेच पशुसंवर्धन विभाग व महापालिकेच्या वतीने बकरी ईद निमित्त केलेल्या तयारी प्रमाणे परस्परात समन्वय ठेवून ईद शांततेत पार पडेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील व सर्व मुस्लिम धर्मीय सामाजिक संघटनांनी प्रशासनालाही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जनावरांची अवैध कत्तल व अवैध वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग, पर्यावरण विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी. ईद सणाच्या काळात मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असून कायदा व स्वास्थ्य तपासणी बाबत राहणाऱ्या त्रुटीचे निराकरण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. महापालिकेचे मंडई नियंत्रण अधिकारी डंके यांनी बकरी ईद निमित्त लहान मोठ्या जनावरांची कुर्बानी देण्यासाठी फॉरेस्ट मटन मार्केट येथे व्यवस्था करण्यात आली असून पाण्याचे टँकरही उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले.

जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर तांबे म्हणाले की, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदा, १९९५ अंतर्गत गाय, वळू, बैल यांच्या कत्तलीस व वाहतुकीस बंदी आहे. जनावरांची वाहतूक करत असताना जनावरांची वाहतूक अधिनियम, २००१ मधील नियम क्र.१६ नुसार वाहतूक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, १९६० व वाहतूक अधिनियम १९७८ मधील नियम ४७ नुसार जनावरांची स्वास्थ्य तपासणी करून न्यायालयीन प्रेषण आवश्यक आहे. ईद सणाच्या वाहतूक करत असताना प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, १९६० मधील वाहतूक नियमांमधील तसेच पशुसंवर्धन विभाग, पर्यावरण विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे सांगितले.

अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य बुऱ्हाण यांनी छोट्या बकऱ्यांना घरीच कुर्बानी देण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण शांततेत सण साजरा करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच हसीफ भाई नदाफ यांनी सोलापूर महापालिकेने मोठ्या जनावर साठी पुढील काळात त्वरित आधुनिक कत्तलखाना निर्माण करण्याची मागणी केली. तसेच अन्य सदस्यांनी बकरी ईद सण शांततेत साजरा करण्यासाठी विविध सूचना मांडल्या.

Previous Post

TOP 25 । सोलापूर महापालिकेने ‘डोंगर’ पोखरून ‘उंदीर’ काढला..!

Next Post

शेतकरी उत्पादक कंपनी / सहकारी संस्थां यांनी मूल्य साखळी भागीदार निवडी करीता 30 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
शेतकरी उत्पादक कंपनी / सहकारी संस्थां यांनी मूल्य साखळी भागीदार निवडी करीता 30 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शेतकरी उत्पादक कंपनी / सहकारी संस्थां यांनी मूल्य साखळी भागीदार निवडी करीता 30 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026