येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी या गावात अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी युगप्रवर्तक बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अतिश गवळी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर प्रकाश टाकला.सदर कार्यक्रमास अकोलेकाटी ग्रामपंचायत सदस्य हणमंत भालेराव, मा.ग्राम. सदस्य सुधाकर कांबळे, रमेश मस्के, आबा कांबळे, धनंजय गायकवाड विठ्ठल सर्वगोड,अमोल झोबाडे, शाखा मस्के, दत्तासाहेब गायकवाड,भारत गायकवाड, राहुल मस्के,सागर सोनवणे व समाजातील सर्व लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगप्रवर्तक बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब मस्के यांनी केले.