• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांचा विजयारंभ !

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2025
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांचा विजयारंभ !
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे विजयारंभ केला.

महाराष्ट्राच्या महिला संघाने सलामीच्या लढतीत यजमान उत्तराखंडचा ३७-१४ असा २३ गुण व १ डाव राखून धुव्वा उडविला, तर पुरूष संघानेही उत्तराखंडला ३७-२२ असे १५ गुण व एक डावाने हरविले.

गौलापूर येथील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारपासून खो-खो स्पर्धा सुरू आहे. प्रियांका इंगळे हिच्या अष्टपैलू खेळामुळे (२.२० मिनिटे नाबाद व २.१० मिनिट संरक्षण व ८ गुण) महिला संघाने उत्तराखंडवर ३७-१४ असा २३ गुण व १ डाव राखून दणदणीत विजय मिळविला. आश्विनी शिंदे (२.३०मि.) व सानिका चाफे (२.२० मिनिटे) यांनी प्रियंकाला संरक्षणात तोलामोलाची साथ दिली. उत्तराखंडची कर्णधार भारती गिरी हिने एक मिनिटे संरक्षण करीत तगड्या महाराष्ट्राला एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला.

पुरुष गटातही महाराष्ट्राने उत्तराखंडला ३७-२२ असे १५ गुण व एक डावाने नमविले. यात रामजी कश्यपने अष्टपैलू खेळ करताना आपल्या धारदार आक्रमणात ८ गडी बाद करीत संरक्षणात १.४६ मिनिटे पळतीचा खेळ केला. अनिकेत चेंदवणकरने २.१० मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. उत्तराखंडकडून पिन्स कश्यप व राहूल शर्मा यांनी प्रत्येकी ६ गडी बाद करीत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
इतर निकाल : पुरुष : ओडीसा विजयी विरुद्ध छत्तीसगड ४३-३४, ९ गुण व ६.२५ मिनिटे राखून.
महिला : ओडीसा वि.वि. तामिळनाडू ३६-१८, १८ गुण व एक डावाने.

महाराष्ट्राचे शानदार संचलन

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात मंगळवारी महाराष्ट्राच्या २० खेळाडू, संघटकांसह शानदार संचलन केले. राजेशाही फेटा परिधान करीत महाराष्ट्राच्या पथकाचे लक्षवेधी संचलन झाले.

जागतिक पदक विजेती महिला तिरंदाज आदिती स्वामी व जगज्जेत्या भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज फडकविला. संचलनात १५ खेळांडूसह पथकप्रमुख संजय शेटे, उपपथकप्रमुख उदय डोंगरे, सुनील पूर्णपात्रे, स्मिता शिरोळे व खजिनदार धनंजय भोसले सहभागी झाले होते.

Previous Post

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडून विविध विभागांचा आढावा

Next Post

इंडियन केमिकल सोसायटीकडून बालाजी अमाईन्सला ‘रसायन उद्योग श्री’ पुरस्कार

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
इंडियन केमिकल सोसायटीकडून बालाजी अमाईन्सला ‘रसायन उद्योग श्री’ पुरस्कार

इंडियन केमिकल सोसायटीकडून बालाजी अमाईन्सला 'रसायन उद्योग श्री' पुरस्कार

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026