राज्यात झालेल्या 288 नगराध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपाने तब्बल 127 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असून त्या पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेने 54 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.अजितदादांच्या राष्ट्रवादीने 36 जागा जिंकून तृतीय क्रमांक राखला आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने 33 जागा जिंकले आहेत. तर
शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने केवळ सात जागा मिळवले असून उबाठा सेनेला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
स्थानिक पातळीवर झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला स्पष्टपणे नकार देत आपला कौल महायुतीच्या पारड्यात टाकल्याचे दिसून आले आहे.

