उत्तर सोलापूर : वडाळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी बापुराव साठे तर व्हाईस चेअरमनपदी दत्ताञय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. वडाळा विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांचे एकतर्फी वर्चस्व राहीलेल्या विकास सोसायटीचे संचालक म्हणून बळीरामकाका साठे, जितेंद्र साठे, बाजीराव गाडे, नारायण गाडे, शिवाजी जमदाडे, बाळासाहेब सुतार, गणी शेख, अर्जुन नागणे, मिलिंद साठे, निर्मला बापू नागणे, नलिनी चंद्रकांत साठे आदी बिनविरोध झाले होते. निवडीनंतर काका साठे, सरपंच जितेंद्र साठे यांनी नुतन चेअरमन बापूराव साठे व नुतन व्हाईस चेअरमन दत्तात्रय गायकवाड यांची सत्कार केला. यावेळी माजी सरपंच प्रभाकर गायकवाड, विकास गाडे, माजी प्राचार्य चंद्रकांत साठे, ग्रामपंचायत सदस्य संपत गाडे, विश्वास साठे, हरीभाऊ घाडगे, श्रीकांत साठे, स्वप्नील गाडे, प्राचार्य शंकर खळसोडे, प्रा. सतीश नागणे आदी उपस्थित होते.