दक्षिण सोलापूर : त्रिशरण एनलाइनमेंट फाउंडेशन पुणे व मंद्रूप पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. मंद्रूपचे तहसीलदार राजशेखर लिंबारे व साहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंद्रूपच्या सरपंच कलावती खंदारे होत्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता नलावडे, डॉ. नीलिमा घोगरे, डॉ. सरिता होमकर, डॉ. सरोज पाटील तसेच विकास दूत प्रकल्पाचे पुणे विभागीय समन्वयक शितल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला दिनानिमित्त ग्रामीण भागात धुणी भांडी करणाऱ्या महिला कामगार, शेतमजूर महिला, महिला सफाई कामगार, आशा वर्कर, महिला पोलीस पाटील, महिला पोलीस, महिला डॉक्टरांचा प्रमाणपत्र, शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात तालुका समन्वयक अन्नपूर्णा लांडगे यांनी त्रिशरण फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. आभार अशा वर्कर केतकी कामतकर यांनी मानले.
