येस न्युज मराठी नेटवर्क : जगासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. सध्या देशात कोरोनाचा घातक व्हेरियंट ओमायक्रॉन धुमाकूळ घालत आहे. ओमायक्रॉननं देशाची चिंता वाढवली आहे. देशात आतापर्यंत 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉननं हातपाय पसरले असून एकूण 3623 ओमायक्रॉनबाधित आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकड्यानुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं 1409 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्हेरियंटमुळं आतापर्यंत देशात दोन मृत्यूची नोंद झाली आहे.