नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगावर कोरोना आणि ओमिक्रॉनचं संकट सुरु आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये दररोज लाखो रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा वेरियंट आणि ओमिक्रॉन वेरिएंटच्या लक्षणांसारखा नवा वेरियंट समोर आला आहे. त्या वेरिएंटचं नाव डेल्टाक्रॉन निश्चित करण्यात आलं आहे. सायप्रस या देशात डेल्टाक्रॉन वेरियंटचे 25 रुग्ण आढळून आले आहेत.
सायप्रसच्या बायोटेक्नॉलॉजी अँड मॉलिक्रुयलर वायरोलॉजी विद्यीपठाच्या प्रयोगशाळेतील प्रमुख डॉक्टर लियोनडिओस कोस्रिकस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सायप्रसमध्ये आढळून आलेल्या 25 रुग्णांपैकी 11 जणांना या वेरिएंटमुळं रु्गणालयात दाखल करावं लागलं होतं.तर, 14 जणांची प्रकृती स्थिर होती. कोस्त्रिकस यांच्या मते रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांमधील म्युटेशनची फ्रीक्वेन्सी जादा होती.