सोलापूर महापालिकेला आणखी एक नवे उपायुक्त…

0
35

सोलापूर महापालिकेला आणखी एक नवा उपायुक्त लाभला आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त आशिष लोकरे यांची महालिकेत उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलन अधिकारी पदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कर संकलन विभागात प्रथमच या पदावर शासनाकडून पूर्ण वेळ अधिकारी पाठविला आहे. आशिष लोकरे हे अनेक वर्षापासून सोलापुरात कार्यरत आहेत. त्यांना कामकाजाचा चांगला अनुभव आहे. सोलापूर महापालिका प्रशासनात सध्याचे दोन उपायुक्त सोडून कर विभागाला उपायुक्त दर्जाचा अधिकारी लाभला आहे. शासनाच्या मंजूर आकृतीबंधानुसार सोलापूर महापालिकेत कर विभागात उपायुक्त पदाचा दर्जा व वेतनश्रेणी असलेली मूल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी एक पद, विशेष कार्यकारी अधिकारी एक पद मंजूर आहे. तसेच सहाय्यक मूल्य निर्धारक व कर संकलन ही सहाय्यक आयुक्त वेतनश्रेणी असलेले दोन पदे मंजूर आहेत. त्यापैकी शासनाकडू सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (गट – ब) आशिष सुधाकरराव लोकरे यांची पदोन्नतीने सोलापूर महापालिकेत उपायुक्त पदी पदोन्नतीने नियुक्ती केली आहे.