मोक्का कायद्यांतर्गत कारवाई…
सोलापूर : बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील आनंद राजकुमार काळे याला घरफोडीच्या दोन गुन्ह्यांप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी मोहोळ येथे पथकासह जाऊन माढा तालुक्यातील मानेगाव येथे सापळा रचून काळे यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर हे करीत आहेत. वैराग पोलीस ठाण्यात स्वस्तात सोने देण्याचा बहाणा करून पिवळ्या धातूच्या पट्ट्या दाखवून साडेचार लाख रुपये जबरीने काढून घेतले म्हणून फिर्याद दाखल आहे.










