सोलापूर : विश्ववंदनीय, विश्वशांतीदूत, साहित्यिक तथा समाजसेवक डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, मजरेवाडी संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळा, सोलापूर येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी डॉ. सुधीर तारे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि मानवतावादी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देत शिक्षण, साहित्य, शांतता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.


कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत डॉ. सुधीर तारे यांच्याप्रती आपला आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक वातावरण प्राप्त झाले.यावेळी शाळेचे अध्यक्ष अशोक उमाप, सचिव अरुण धोत्रे तसेच शाळेतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. सुधीर तारे यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.डॉ. सुधीर तारे साहेबांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.या वेळी प्रमुख पाहुणे सारा न्युज चॅनलचे संपादक राम हुंडारे, महाराष्ट्र रत्नचे संपादक अप्पासाहेब लंगोटे, पत्रकार सेवा संघाचे शहर उपाध्यक्ष केशव कोळी आधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजयकुमार लोंढे यांनी केले. याप्रसंगी वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.











