• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 26, 2020
in मुख्य बातमी
0
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि. 26 : सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच आणि हे वचन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

      महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात आयोजित हुतात्मा दालन उद्‌घाटन व कॉफी टेबल बुक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

      मुख्यमंत्री म्हणाले, शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. 26 नोव्हेंबर हा शौर्यदिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक. हा दिवस आपण विसरू शकत नाही. त्या दिवशी मी मुंबई बाहेर होतो. मुंबईतील घटना कळताच प्रथम विजय साळसकरांना फोन लावला. घटनेची माहिती देताना साळसकरांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जात आहे. काही वेळानी मी त्यांना फोन लावला, पण तो फोन उचलला गेलाच नाही आणि ती दुर्दैवी घटना घडली. बारा वर्ष झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही.

      अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस एक महत्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे, त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्ला काय पण मुंबईचे नाव पण घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करू.

      पोलिसांची कामे ही जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात यावी. देश-विदेशातही पोलीस व लष्करी प्रशिक्षणाची व्यवस्था शालेय जीवनापासून आहे, असे सांगतांना त्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. पोलिसांवरील हल्ला ही अत्यंत चुकीची बाब असून त्यांच्या कर्तव्याचा आपण आदर केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अप्रतिम कॉफिटेबल बुक

        ‘अतुल्य हिंमत’ हे युक्ती आणि प्रसंगी शक्तीचा वापर करुन पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीचा सचित्र दस्तावेज आहे. हे पुस्तक अप्रतिम झाले असून मी त्याकडे मुख्यमंत्री, नागरिक आणि कलावंत अशा तिहेरी भुमिकेतून पाहत आहे. अतिशय सुबक मांडणी व सुयोग्य सादरीकरण या कॉफिटेबल बुकमध्ये आहे. अशा प्रकारच्या अप्रतिम कॉफिटेबल बुकच्या निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांचे अभिनंदन केले.
Previous Post

एक देश एक निवडणूक ही देशाची गरज : पंतप्रधान

Next Post

इंडियन आयडलच्या सेटवर करायचा साफसफाई, गाणे ऐकून परिक्षक भावूक

Related Posts

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
TOP 25 । ‘उजनी’ मायनस मध्ये.. निम्मे पाणी संपले, धरणात 63 TMC पाणीसाठा…
मुख्य बातमी

TOP 25 । ‘उजनी’ मायनस मध्ये.. निम्मे पाणी संपले, धरणात 63 TMC पाणीसाठा…

May 6, 2026
Next Post
इंडियन आयडलच्या सेटवर करायचा साफसफाई, गाणे ऐकून परिक्षक भावूक

इंडियन आयडलच्या सेटवर करायचा साफसफाई, गाणे ऐकून परिक्षक भावूक

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026