• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मतदार याद्यांमधील त्रुटींवर सर्वपक्षीय विरोधकांचा एल्गार: निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा, संजय राऊतांची घोषणा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 19, 2025
in इतर घडामोडी
0
मतदार याद्यांमधील त्रुटींवर सर्वपक्षीय विरोधकांचा एल्गार: निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा, संजय राऊतांची घोषणा
0
SHARES
0
VIEWS

मुंबई – राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. या गंभीर त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीत विरोधकांनी मतदारयाद्यांमधील त्रुटी आयोगासमोर मांडल्या. मात्र, आपले समाधान झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रात 96 लाख बोगस मतदार असल्याचा मोठा दावा केला. यानंतर सर्वपक्षीय विरोधकांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत निवडणूक आयोगाविरोधात मुंबई मोर्चा काढणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली.

आयोगाच्या घोटाळ्यांबाबत लढाई सुरू

संजय राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष एक लढाई लढत आहेत. ही लढाई राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत लढतोय. त्यानंतर आता महाराष्ट्रात ही लढाई सुरू झालेली आहे. या लढाईतून काय निष्पन्न होईल याविषयी शंका आहे.

शहांनी आधी महाराष्ट्रातील घुसखोर बाहेर काढावेत

आजच राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले. मतदार करा किंवा करू नका, निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालेले आहे. या मॅच फिक्सिंगविरुद्ध आपली लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख बोगस मतदार आजही आहेत. हे मतदार मतदार आमच्या दृष्टीने घुसखोरच आहेत. या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणे ही लोकशाहीची गरज आहे. कालच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावे मतदार यादीतून बाहेर काढू, असे सांगितले. त्यामुळे अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत घुसलेले एक कोटी मतदारांना आधी बाहेर काढावे आणि त्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करावी, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

Previous Post

शाश्वत समाधानासाठी प्रेमाची अधिस्विकृती झाली पाहिजे – विवेक घळसासीशाश्वत समाधानासाठीशास्वत समाधानासाठी प्रेमाची अधिस्विकृती झाली पाहिजे – विवेक घळसासी

Next Post

मुंबईतील नेस्को मैदानावरील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक

Related Posts

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
Next Post
मुंबईतील नेस्को मैदानावरील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक

मुंबईतील नेस्को मैदानावरील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026
आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026