• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2026
in Blog
0
अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर ग्रामीणमध्ये बेकायदा शस्त्रांचा साठा उघड ; सहा जेरबंद

१७ पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे अन् कार जप्त ; अकलुज पोलिसांची मोठी कारवाई

सोलापूर (प्रतिनिधी) विनापरवाना देशी बनावटीची अग्निशस्त्रे आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या टोळीचा अकलुज पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १७ पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे माढा, पंढरपूर, सांगोला तसेच सांगली आणि कर्नाटकपर्यंत पसरलेल्या बेकायदा शस्त्रविक्रीचे धागेदोरे समोर आले आहेत.
अटक आरोपींमध्ये विकास कैलास वजाळे (३१, रा. परीते, ता. माढा), राहुल सतीश माने (३४, रा. मिरज), महादेव बाळासाहेब कोरके (३०, रा. करकंब), विजय सदाशिव किरणगी (३४, रा. शिवणुर, कर्नाटक), अनिल पंचलाल मेहता (३२, रा. रांजणगाव, मध्य प्रदेश) आणि सुमित नाना लवटे (१९, रा. भुईटे वस्ती, सांगोला) यांचा समावेश आहे. प्रदीप पांडुरंग माने आणि शनि भारत बनसोडे हे दोघे फरार आहेत.

कारमधून पिस्तूल घेऊन विक्रीला ; गुप्त माहितीवर पहिली कारवाई

१४ ऑगस्ट रोजी अकलुज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परीते येथील विकास वजाळे याला टाटा नेक्सॉन कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने ही शस्त्रे राहुल माने याच्याकडून घेतल्याची तसेच विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी करकंब, सांगोला, अकोले खुर्द, मिरज आणि कर्नाटक येथे कारवाई करत शस्त्रे जप्त केली.
दरम्यान, विकास वजाळे याने मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सोनगीर, धुळे येथे सापळा रचला. तेथे मेहता याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार अग्निशस्त्रे आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर राहुल माने यालाही टेंभुर्णी परिसरातून अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कटे आणि अकलुज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अकलुजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.

गुन्हा दाखल ; फरार आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणी अकलुज पोलीस ठाण्यात गु.र. नं. ५६०/२०२६ दाखल असून, भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ३, ५, २५, बीएनएस कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१)(३), १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा शस्त्रबंदीचा आदेश लागू असतानाही आरोपींकडे विनापरवाना शस्त्रे आढळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अटक सहाही आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्ट २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.

Previous Post

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

Next Post

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

Related Posts

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार
Blog

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
Blog

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
Next Post
सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026