• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अखिल भाविक वारकरी मंडळ हे वारकरी सेवेसाठी कटीबद्ध : ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज

Yes News Marathi by Yes News Marathi
September 18, 2024
in इतर घडामोडी
0
अखिल भाविक वारकरी मंडळ हे वारकरी सेवेसाठी कटीबद्ध : ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज
0
SHARES
0
VIEWS


सोलापूर – समाजाला योग्य दिशा आणि संस्कार संतच देत असतात. जेव्हा जेव्हा समाज भरकट असतो तेव्हा तेव्हा संत समाज प्रबोधन करून समाजाला योग्य दिशा देतात. धर्म आणि संस्कार टिकवण्याचे जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या सर्व सदस्यांनी संघटीत होऊन एकजुटीने काम केले पाहिजे.

वारकरी मेळावा हा सांप्रदायिक विचारांची देवाणघेवाण करणारा मेळावा आहे व वारकरी सेवेसाठी कटीबद्ध आहे असे प्रतिपादन अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.
तरुणांमध्ये वारकरी विचार रुजवण्यासाठी, तरुणाई व्यसनमुक्त करणेसाठी, तरुणांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ करणेसाठी, ऐतिहासिक वारसा, संस्कृती, परंपरा, ई. विषयावर मंथन करणेसाठी, शहर व जिल्ह्यातील तरुण व महिला भाविकांचे संघटन करणेसाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने संघटनेच्या चतुर्थ वर्धापना निमित्त डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे 16 सप्टेंबर 20024 रोजी वारकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रथमता सर्व मान्यवरांच्या हस्ते विठुरायाच्या मूर्तीला हार अर्पण करून व दिप प्रज्वलन करुन राम कृष्ण हरीच्या गजरामध्ये मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज म्हणाले, वारकरी मेळावा विचारांची देवाणघेवाण करणारा मेळावा आहे.वारकरी सांप्रदायात विशेष कार्य करण्यासाठी प्रेरणा वारकरी मेळाव्यातून मिळते. प्रत्येकाने अ भा वारकरी मंडळाचे कार्य संघटीत होऊन करणे गरजेचे आहे. प्रत्येक वारकरी हा वारकरी असतो त्यात कोणताही स्त्री पुरुष असा भेदाभेद केला जात नाही.

वारकरी संप्रदायाने एक विशिष्ट आचारधर्म स्वीकारलेला आहे. या आचारधर्माची काही वैशिष्ट्ये आहेत, जी प्रत्येक वारकरी जीवाभावाने जपतो. ती सारी वैशिष्ट्ये बघितली की त्यातील सहजता लगेच लक्षात येते. परस्परांसोबत वावरताना वारकरी संप्रदाय कधीही कुठलाही भेदभाव मानत नाही. महिला पुरुष हा भेद वारकरी कधीच पाळत नाहीत. ही समानता काळाची गरज बनली आहे. सत्य, अहिंसा, सेवा, त्याग, दया, शांती या नीतीतत्त्वांना वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्व आहे.या मेळाव्यामध्ये वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर विचार-विनिमय त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे विचार प्रत्येकाच्या घराघरात कशाप्रकारे पोचवता येतील या विषयावर चर्चा करत मान्यवरांनी मत व्यक्त केले.

व्यासपीठावर अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, ह.भ.प.बळीराज जांभळे महाराज (राष्ट्रीय सचिव), ह.भ.प.जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), ह.भ.प.मोहन शेळके (प्रदेश सचिव ) , संजय पवार (शहर अध्यक्ष), ह.भ.प. अभिमन्य डोंगरे महाराज ( विश्‍वहिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ), ह.भ.प. ज्ञानेश्‍वर भगरे (पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष) , पार्वती आवताडे (पंढरपूर विभाग महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), ह.भ.प.काशिनाथ दळवी , ह.भ.प.दगडू डोंगरे (मराठवाडा विभाग उपाध्यक्ष), शुभांगी शेळके (सोलापूर महिला जिल्हाध्यक्षा), वैशाली वळसंगकर (महिला शहराध्यक्षा), संगीता आवताडे (मंगळवेढा महिला तालुकाध्यक्षा), निर्मला मिठ्ठा (महिला सहजिल्हाध्यक्षा) श्री मार्कंडेय दिंडी संस्था , उमाबाई साका (शहर सहअध्यक्षा), ह भ प दर्शन ढगे (युवा अध्यक्ष ) संत तुकाराम महाराज पालखी , अच्युत मोफरे महाराज, युवा समिती सोलापूर (शहर व जिल्हा), उपस्थित होते.

या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक व वारकरी मंडळी आणि संघटनेचे पदाधिकारी आले होते. विशेष म्हणजे महिला वारकरी मंडळ ही मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पवार (शहराध्यक्ष ) यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील महाराज यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मोहन शेळके महाराज यांनी मानले.

ज्या व्यक्तींनी वारकरी घडवण्याचे अनमोल कार्य केले आहे. अशा व्यक्तीचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला. ते पुढील प्रमाणे
1) ह भ प बळीराम जांभळे महाराज
2) ह भ प पंकज गुंड महाराज
3)ह भ प बाळासाहेब बाबर महाराज (दारफळ बी बी )
4) ह भ प पांडुरंग फलमारी
5) ह भ प मनोज कासार आणि ह भ प काशिनाथ सुरवसे
6) ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ (SRP कॅम्प, सोरेगाव )

तसेच यावेळी कुमार गायकवाड, दत्तात्रय क्षीरसागर महाराज, सचिन गायकवाड , निवृत्ती मोरे , ज्ञानेश्वर चव्हाण महाराज , प्रदीप माने, महादेव वाघमारे महाराज , अभिमान घंटे (तालुका अध्यक्ष ), रामलिंग भगरे , दत्तात्रय तोडमे, संजय केसरे , भाऊसाहेब बेलेराव, शंकर घुले , सुमंत शेळके, गोविंद माने, दादा गायकवाड, जयबा डोंगरे,लिंगराज पल्लोलू, नंदा बेलेराव, सुरेखा साठे, महानंदा पांढरे, मीराताई बोगे, मंगल दीक्षित, सिंधू देसाई,मंगल साळुंखे, इ, पदाधिकारी व अखिल भाविक वारकरी मंडळ महिला व पुरुष सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उत्साह पूर्ण वातावरणात मेळावा संपन्न होऊन पसायदानाने समारोप करण्यात आला.

Previous Post

तब्बल २३ तासांनंतर लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न

Next Post

देवेंद्र फडणवीस कितीही गणित करु द्या, मी त्याची सगळी गणितं फेल करणार : मनोज जरांगे

Related Posts

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
Next Post
देवेंद्र फडणवीस कितीही गणित करु द्या, मी त्याची सगळी गणितं फेल करणार : मनोज जरांगे

देवेंद्र फडणवीस कितीही गणित करु द्या, मी त्याची सगळी गणितं फेल करणार : मनोज जरांगे

ताज्या बातम्या

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे

June 16, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026