• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मागणीनुसार १२० कोटी रुपयांचा अधिकचा निधी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2021
in मुख्य बातमी
0
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मागणीनुसार १२० कोटी रुपयांचा अधिकचा निधी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 12: जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेच्या सन २०२१-२२ साठीच्या ४७० कोटी रुपयांच्या आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या आग्रही मागणीस्तव सोलापूर जिल्ह्याला १२०.१३ कोटी रुपये अधिक देण्यास पवार यांनी मान्य केले.

        येथील विधानभवन येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस पालकमंत्री दत्तात्रय भरणे, वित्त राज्यमंत्री शंभूराजे देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार सर्वश्री संजय शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, यशवंत माने, रणजितसिंह मोहिते-पाटील, वित्त आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते. 

        बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्हा नियोजन आराखड्याचे सादरीकरण केले. राज्य शासनाने आराखडा नियोजनास 349.87 कोटीची मर्यादा घातली होती.  मात्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेल्यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे शाळा, इमारती, रस्ते, जलसंपदा प्रकल्प यांचे नुकसान झाले आहे. या सर्व बाबी पूर्ववत करण्यासाठी त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि जिल्ह्यातील विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त 140 कोटी रुपयांची मागणी केली. त्यावर  पवार यांनी 120.13 कोटी रुपये अधिक देण्याचे मान्य केले.

        अधिकच्या निधीतून आरोग्य सुविधा बळकट करा, नाविन्यपूर्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका वेळेत घ्या, प्रशासकीय मान्यता वेळेत घ्या, शाश्वत विकास क्षेत्रात प्रभावी कामगिरी करा, अशा सूचना पवार यांनी केल्या. 

        यावेळी आमदार  शिंदे यांनी शाळा इमारती, महावितरणची पायाभूत सुविधा यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी तरतूद करावी अशी मागणी केली. आमदार कल्याणशेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळांच्या विकासासाठी अधिक निधी देण्याची मागणी केली.

        पालखी मार्गांच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केल्या. याबाबत आमदार श्री. मोहिते-पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला होता.  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांनी शाळांना पुनर्स्थापित करण्यासाठी पाच कोटी रुपये मिळाले आहेत आणखी चार कोटींची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर  राव यांनी केंद्र सरकारच्या निकषानुसार भरपाईसाठी प्रस्ताव पाठवू असे सांगितले. बाधित झालेल्या सर्व शाळा अतिशय चांगल्या, नीटनेटक्या करा, अशा सूचना  पवार यांनी दिल्या.

        बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी अर्जुन गुंडे, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सहायक आयुक्त कैलास आढे, उपायुक्त अजयसिंह पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
Previous Post

सोलापूर जिल्ह्याला मिळणार 470 कोटी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ सोलापूर उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
Next Post
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ सोलापूर उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ सोलापूर उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026