• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक – राज्य वस्तू व सेवा कर विभागाची  कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
April 2, 2023
in इतर घडामोडी
0
११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक – राज्य वस्तू व सेवा कर विभागाची  कारवाई
0
SHARES
1
VIEWS

सामान्य नागरिकांच्या पॅन व आधार कार्डाद्वारे ११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला राजस्थान येथील जयपूर येथून अटक करण्यात आली. राज्यकर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकाने जयपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

मयुर नागपाल हा बेनामी पद्धतीने ई-मेल तयार करत असल्याचे आढळून आले. बेनामी ई-मेल आणि खोट्या कंपन्यांशी, त्याचा थेट संबंध दिसून आले. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर कायद्याच्या कलम 132 अन्वये हा गुन्हा ठरत असल्याने त्यास अटक करण्यात आली. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी, मुंबई यांनी आरोपीस 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

मे. माही एंटरप्रायजेस या कंपनीच्या भिवंडी आणि नाशिक येथील पत्यावर छापे टाकण्यात आले.  तेथे कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. या कंपनीने जवळपास 22 कोटींच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा  फायदा घेतल्याचे दिसून आले. त्याचबरोबर, मे. माही एंटरप्रायजेस आणि या कंपनीसोबत व्यवहार दाखविणाऱ्या कंपन्या यांच्या ई-मेल व मोबाईल नंबरमध्ये काही सामाईक दुवे सापडले. याप्रकरणी सायबर फॉरेन्सिक तज्ञांचीही मदत घेण्यात आली. पुढील तपासासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्ली व नोएडाला जाऊन आले. राष्ट्रीयकृत बॅंका, आणि दूरसंचार सेवा देणाऱ्या संस्थांकडून माहिती गोळा करण्यात आली. राज्यकर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकाने आणि जयपूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला शोधून काढले. जयपूरमधल्या एका बंगल्यातल्या तळघरातून आरोपी हे बेकायदेशीर काम करत असल्याचे आढळून आले. त्याचा जबाब नोंदविण्यात आला. याप्रकारे तयार केलेल्या खोट्या कंपन्यांची संख्या पुढील तपासात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधातील राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या प्रयत्नांना या कारवाईमुळे मोठे यश मिळाले आहे.

या प्रकरणाचा तपास, अन्वेषण-ब विभागाच्या प्रमुख व राज्यकर सहआयुक्त श्रीम. वान्मथी सी.( भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यकर उपायुक्त श्रीम. रुपाली बारकुंड यांच्या प्रत्यक्ष सहभाग व देखरेखीखाली करण्यात आला. तपास अधिकारी व सहायक राज्यकर आयुक्त डॉ. ऋषिकेश वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. सर्व सहायक आयुक्त, सर्वश्री- दिपक दांगट, रामचंद्र मेश्राम व सुजीत पाटील यांनी तपासात सहाय्य केले. अन्वेषण शाखेच्या राज्यकर निरीक्षकांनी यात मोठे योगदान दिले.

आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये ,राज्य वस्तू व सेवा कर विभागाने केलेली ही 73 वी अटक आहे. हे प्रकरणाचा तपास महाराष्ट्र शासन तसेच उत्तर प्रदेश व राजस्थान शासनाच्या यंत्रणांशी यशस्वीपणे समन्वय साधून करण्यात आला. यातील लाभलेले यश हे ‘एक राष्ट्र, एक कर, एक बाजार’ या संकल्पनेसंदर्भात उत्तम उदाहरण असल्याचे राज्य वस्तू व सेवा कर विभागाने नमूद केले आहे.

Previous Post

साईबाबा हे ‘देव’ नाहीत, बागेश्वर बाबा बरळले

Next Post

मध्य नागपूरची ‘लाईफलाईन’ ठरणाऱ्या एक हजार कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
मध्य नागपूरची ‘लाईफलाईन’ ठरणाऱ्या एक हजार कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन

मध्य नागपूरची ‘लाईफलाईन’ ठरणाऱ्या एक हजार कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026