• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खुनाच्या प्रकरणात आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
November 27, 2025
in मुख्य बातमी
0
खुनाच्या प्रकरणात आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – बिटरगाव वांगी येथे घडलेल्या मयत प्रभावती डोंगरे यांच्या खुना प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी गु. र. क्र. ०६६३/२०२४ नोंदविण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२ आणि ३५१(३) अन्वये दिनेश दत्तात्रय पांढरे (वय ३२, रा. बिटरगाव वांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्यासह एकूण ५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात झाला होता. या घटनेत प्रभावती डोंगरे यांचा मृत्यू झाल्यानंतर फिर्यादी शिवाजी हरिदास डोंगरे यांनी दिलेल्या जबाबावरून सहआरोपी राणी पांढरे, ओंकार पांढरे, सत्यम पांढरे आणि आशा पांढरे यांनी मृतकास मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले होते.

आरोपी दिनेश पांढरे यास ११ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथील दाखल जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तब्बल एक वर्षापेक्षा अधिक काळ कारावासात असलेल्या आरोपीतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, तद्नंतर जामीनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जात आरोपीच्या वकिलामार्फत युक्तिवाद करण्यात आला की मृत्यूप्रकरणी दिनेश पांढरे याची कोणतीही थेट भूमिका सिद्ध झालेली नाही. मृतकास मारहाण केल्याचे आरोप केवळ सहआरोपी राणी पांढरे आणि आशा पांढरे यांच्यावर आहेत. आरोपीवर फक्त फिर्यादीस लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचा आरोप असून मृत्यू होण्यास कारणीभूत ठरेल असे कोणतेही कृत्य त्याच्याकडून झाले नाही. तपास पूर्ण झाला आहे, चार्जशीट दाखल आहे, खटल्यात कोणतीही प्रगती नाही आणि खटला संपण्यास आणखी वेळ लागणार असल्याने आरोपीला पुढे कारागृहात ठेवणे न्याय्य नाही, असा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे मा. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी दिनेश दत्तात्रय पांढरे यास सशर्त जामीन मंजूर केला आहे. संबंधित प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड. अक्षय जगताप, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. मोहीम पठाण, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मनिष बाबरे, ॲड. अभिषेक नागटिळक, ॲड. रोहित थोरात, ॲड. सलामत पटेल आणि ॲड. त्वरिता वाघ यांनी काम पाहिले.

Previous Post

कडेकट पोलीस बंदोबस्तात सोलापुरातील 34 केंद्रावर आज टीईटीची परीक्षा

Next Post

ठरलं.. रेल्वे ब्रीज पाडणार.. 54 मीटर रस्ता अर्धवट..!

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
ठरलं.. रेल्वे ब्रीज पाडणार.. 54 मीटर रस्ता अर्धवट..!

ठरलं.. रेल्वे ब्रीज पाडणार.. 54 मीटर रस्ता अर्धवट..!

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026