बार्टी, सारथी प्रवेशावर मर्यादा घालणार – अजित पवार
दादांच्या समर्थनार्थ देवाभाऊ रिंगणात
शिष्यवृत्ती मिळते म्हंटल्यावर एकाच कुटुंबातले पाच पाच लोक पीएचडी करत आहेत. त्यामुळे बार्टी आणि सारथी प्रवेशावर मर्यादा घालण्यात येईल असे अजित पवार यांनी अधिवेशनात सांगितले.
यावर पीएचडी करणे म्हणजे पांढर्या कागदाचं काळं करणे एवढं सोप्प नाहीये, अशी उपरोधिक टीका सुषमा अंधारे यांनी केली.
अजित दादांचा बचाव करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे रिंगणात उतरले. अजित पवार यांचा बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जर असे घडत असेल तर ते चुकीचे आहे. गरजूंना या योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.
संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप निधी मागताच अजित पवार सभागृह सोडून निघून गेले.

