• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 12, 2026
in मुख्य बातमी
0
लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
0
SHARES
0
VIEWS

मंत्रालयात जेवढे कर्मचारी आहेत तेवढेच म्हणजे सुमारे सात हजार कर्मचारी सोलापूर महापालिकेत कार्यरत आहेत. मात्र इथली प्रशासकीय शिस्त पूर्ण बिघडली आहे. बहुतांश नगरसेवक नव्याने निवडून आल्यामुळे आणि जुने अभ्यासू नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी नगरसेवकांना एक प्रकारे उल्लू बनवत आहेत. बीओटीचा विषय असो, शाळांच्या दुरुस्तीचा विषय असो, पाणीपुरवठ्याचा विषय असो की भूमी मालमत्ता चा विषय असो. महापालिकेतील अधिकारी पदाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेतात. काल असाच एक प्रकार स्थायी समितीमध्ये उघड झाला. सिद्धेश्वर तलावालगतची सिटी सर्वे क्रमांक 6043 ही सुमारे 19 हजार चौरस फुटाची जागा असताना ती 2000 आहे असं सांगून भूमी मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांची दिशाभूल केली.

वास्तविक ही जागा हडपण्याचा दुसरीच संस्था प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना खोडा घालण्यासाठी किंवा दोन्ही संस्थांनी मिळून निम्मी निम्मी जागा घेण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आला. स्थायी समिती सभापती याबाबत अनभिज्ञ होत्या. शिंदे सेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी या विषयावर आवाज उठल्यावर हा विषय ना मंजूर करण्यात आला. शहरात असे कितीतरी विषय दररोज पत्रकार,नागरिक हे पदाधिकारी आणि प्रशासनाला देतात. मात्र मनमानी कारभार सुरू आहे. यात सर्वसामान्य भरडले जात आहेत. त्यामुळेच लहरी राजा.. प्रजा आंधळी..अधांतरी दरबार..उद्धवा अजब तुझे सरकार… हेच गाणे सोलापूर महापालिकेच्या कारभाराला तंतोतंत लागू पडते.

Previous Post

धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

Related Posts

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
Next Post
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026