येस न्युज मराठी नेटवर्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताने पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर शानदार गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाला १९१ धावांवर रोखले. पहिल्या डावात भारताने ५३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली आहे.
या सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भाराताची अवस्था अत्यंत बिकट केली. अवघ्या 15 धावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडलाच, शिवाय संघाच्या ३६ धावांवर भारताचे 9 फलंदाज माघारी परतले होते. ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाने आजच्या पहिल्या सत्रात आतापर्यंत एकूण 5 विकेट्स गमावल्या आहेत. यामुळे टीम इंडियाची ताज्या आकडेवारीनुसार 19-6 अशी स्थिती झाली आहे. टीम इंडियाच्या टॉप 6 फलंदाजांपैकी 2 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित 4 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.