१९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय; मोहिते पाटलांनी माळशिरसचा गड राखला
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने मोठे यश मिळवत १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलने भाजपप्रणित पॅनलसमोर आव्हान उभे केले होते. मात्र, माळशिरसचा गड राखण्यात मोहिते पाटील यांना यश आले. माळशिरस विकास सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले.
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची लढत बँक आणि पतसंस्था मतदारसंघातून पाहायला मिळाली. भाजपप्रणित पॅनलचे मनीष देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा २८ मतांनी पराभव केला.
🏆 भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचे बिनविरोध विजयी उमेदवार
१. राजेंद्र राऊत – बार्शी विकास सोसायटी
२. प्रशांत परिचारक – पंढरपूर विकास सोसायटी
३. विक्रांत (बाळराजे) पाटील – मोहोळ विकास सोसायटी
४. सिद्धेश्वर आवताडे – मंगळवेढा विकास सोसायटी
५. यशराज शिंदे – माढा विकास सोसायटी
६. श्रीदीप हसापुरे – दक्षिण सोलापूर विकास सोसायटी
७. पृथ्वीराज माने – उत्तर सोलापूर विकास सोसायटी
८. शंभूराजे जगताप – करमाळा विकास सोसायटी
९. सचिन कल्याणशेट्टी – अक्कलकोट विकास सोसायटी
१०. अजिंक्यराणा पाटील – ओबीसी प्रवर्ग
🗳️ भाजपप्रणित पॅनलचे निवडून आलेले उमेदवार
१. बाबासाहेब देशमुख – सांगोला विकास सोसायटी
२. अर्चना घाडगे – महिला प्रवर्ग
३. शामल बागल – महिला प्रवर्ग
४. राजेंद्र बंदीछोडे – इतर मागास प्रवर्ग
५. रणजितसिंह शिंदे – कृषी व प्रक्रिया
६. मनीष देशमुख – बँक व पतसंस्था
७. सूर्यादित्य साळुंखे – दुग्ध विकास
८. महादेव कांबळे – अनुसूचित जाती प्रवर्ग
🌾 स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे विजयी उमेदवार
१. अर्जुनसिंह मोहिते पाटील – माळशिरस विकास सोसायटी











