• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

Yes News Marathi by Yes News Marathi
November 26, 2026
in इतर घडामोडी
0
दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठात ‘बालाजी अमाइन्स उद्यम प्रेरणा केंद्रा’च्या इमारतीचे भूमिपूजन

सोलापूर- विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता विकसित व्हावी, त्यांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू करण्यात येत असलेले ‘बालाजी अमाइन्स उद्यम PAHSU प्रेरणा केंद्र’ ही काळाची गरज ओळखून टाकलेली महत्त्वपूर्ण पायरी आहे. उद्योजक घडविण्यासाठी एखादा उद्योजक स्वतःहून पुढे येतो, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठात दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे उद्दिष्ट असून, सोलापूर जिल्ह्यात उद्योजकतेच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बालाजी अमाइन्स लिमिटेडच्या सीएसआर निधीतून तसेच उद्यम PAHSU फाउंडेशन इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ‘बालाजी अमाइन्स उद्योग PAHSU प्रेरणा केंद्रा’च्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) विद्यापीठाच्या मुख्य सभागृह परिसरात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर बोलत होते. यावेळी बालाजी अमाइन्स लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, सोलापूर गारमेंट असोसिएशनचे अमित जैन, आर्किटेक्ट मनोजकुमार मर्दा, उद्यम फाउंडेशनचे डॉ. राजेश गुराणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अतुल लकडे यांनी केले.

कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ पदवी देणे एवढेच विद्यापीठाचे काम नसून, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे, रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविणे हीदेखील विद्यापीठाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या दृष्टीने बालाजी अमाइन्ससारखा उद्योग समूह पुढाकार घेत आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रेरणा मिळेल. उद्योग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या मुलाखती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, त्यातून नव्या पिढीला उद्योजकांच्या प्रवासाची, संघर्षाची आणि यशाची माहिती मिळेल.

विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगताना कुलगुरू डॉ. महानवर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठाने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, जागतिक तापमानवाढीचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. हवामानातील बदल, पाणीटंचाई आणि पर्यावरणीय असमतोल यांचा विचार करता आपण वेळीच जागे होण्याची गरज आहे. केवळ चर्चा करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून विद्यापीठ परिसरात पाच लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या १०० एकर क्षेत्रात मका पेरणी करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून उत्पादित होणारा मका जनावरांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. भविष्यात हे केंद्र देशातील सर्वोत्तम मॉडेल ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्योजक आणि विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने संवाद घडवून आणावा, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रोजेक्ट रिपोर्ट, व्यावसायिक नियोजन आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन केंद्रात उपलब्ध करून द्यावे. यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली. चंद्रिका चौहान यांनी बालाजी अमाइन्सच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांनी कुलगुरूंच्या पुढाकाराचेही कौतुक केले.

या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे तसेच विविध अधिकार मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले तर आभार अमित जैन यांनी मानले.

Previous Post

अधिवेशनाचा धसका…क्राइम मीटिंगमध्ये पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्याबाबत दिल्या सूचना…!

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
इतर घडामोडी

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

November 26, 2026
किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!
इतर घडामोडी

किल्ले बांधणी स्पर्धा म्हणजे इतिहास मनामनांत रुजविणारी प्रयोगशाळा!

November 26, 2026
हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा
इतर घडामोडी

हयातीचा दाखला सादर करण्यासाठी २६ नोव्हेंबरला विशेष मेळावा

November 25, 2026
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा!

November 26, 2026
दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

दरवर्षी ५० स्टार्टअप सुरू करण्याचे सोलापूर विद्यापीठाचे उद्दिष्ट: कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

November 26, 2026
अधिवेशनाचा धसका…क्राइम मीटिंगमध्ये पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्याबाबत दिल्या सूचना…!

अधिवेशनाचा धसका…क्राइम मीटिंगमध्ये पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्याबाबत दिल्या सूचना…!

November 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026