• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2026
in Blog
0
आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत
0
SHARES
0
VIEWS

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मध्यरात्री घटनास्थळी भेट; बचावकार्याचा घेतला आढावा

दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करणार; जिल्ह्यातील सर्व विहिरींचे सर्वेक्षण करण्याचे प्रशासनाला निर्देश

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी मध्यरात्री एक वाजता घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणांकडून शोधकार्याचा सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

आंबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने चार कामगार त्याखाली अडकले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, अग्निशमन दल तसेच संबंधित बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत रांझणी येथील सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे हे दोन कामगार मृतावस्थेत आढळून आले, तर अनवली येथील अन्य दोन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्यातील अडचणी, उपलब्ध यंत्रणा, शोधकार्याची प्रगती आणि पुढील कार्यवाही याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी असून मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विहीर खोदकाम आणि ब्लास्टिंगच्या परवानगीची चौकशी होणार

विहीर खोदकामासाठी आवश्यक प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती का, ब्लास्टिंग करण्यास परवानगी होती का, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता अशा प्रकारे काम सुरू असेल, तर ती गंभीर बाब आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी विहिरींची कामे सुरू आहेत. यामध्ये परवानगी घेऊन सुरू असलेल्या तसेच विनापरवाना खोदण्यात येणाऱ्या विहिरींची माहिती प्रशासनाने संकलित करावी. सर्व विहीर खोदकामांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दगडांच्या नमुन्यांची तपासणी; ब्लास्टिंगमध्ये वापरलेल्या रसायनांचाही शोध

दरम्यान, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दुर्घटनेची समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विहिरीतून शोधकार्यादरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या दगडांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून, ब्लास्टिंगसाठी कोणत्या प्रकारचे केमिकल किंवा रासायनिक पदार्थ वापरण्यात आले होते, याचाही तपास केला जाणार आहे. त्यामुळे दुर्घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील परवानगीप्राप्त आणि विनापरवाना सुरू असलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, संबंधित कामांची परवानगी आणि सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जाईल. आंबे येथील दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाला प्राधान्य दिले आहे.

दुर्घटनेतील बचाव व शोधकार्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः बारा तासांहून अधिक काळ घटनास्थळी उपस्थित राहून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. बचावकार्याची प्रगती आणि आवश्यक साधनसामग्रीबाबत त्यांनी सातत्याने आढावा घेतला.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लारवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

Related Posts

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!
Blog

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

November 14, 2026
सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी
Blog

सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी

November 13, 2026
शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक
Blog

शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक

November 12, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?
Blog

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?

November 12, 2026
सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान
Blog

सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान

November 12, 2026
मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!
Blog

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

November 16, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

November 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026