देशाची अर्थव्यवस्था महागाई आणि रुपयाच्या घसरणीचा सामना करत असतानाच ऑक्टोबर महिन्यात भारताच्या वस्तू निर्यातीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. ऑक्टोबर महिन्यात वस्तूंची निर्यात तब्बल ४९.४७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही निर्यात ३४.११ अब्ज डॉलर होती. त्या तुलनेत यंदा मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे.भारताची एकूण आयातही वाढून ११०.०७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, चीन, सिंगापूर, ब्रिटन, बांगलादेश, जर्मनी आणि इटली या देशांमध्ये भारताची निर्यात होत आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय निर्यातीने गाठलेला हा विक्रमी टप्पा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.










