• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 14, 2026
in इतर घडामोडी
0
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
0
SHARES
0
VIEWS

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मनःशांती, आनंद आणि समाधान मिळविण्यासाठी आध्यात्मिक विचारांची नितांत गरज आहे. याच उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, सोलापूर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या आणि राजयोग शिक्षिका बी.के. शिवानी दीदी यांच्या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.

‘सरल मन, सरल जीवन’ या विषयावर होणारा हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० ते रात्री ८ या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश ठेवण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीला मानसिक तणाव, नकारात्मक विचार आणि कौटुंबिक तसेच सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मनःशांती, सकारात्मक विचार, आनंदी जीवन आणि आत्मिक समाधान मिळविण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरत आहे. बी.के. शिवानी दीदी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना नकारात्मक विचारांवर मात करून शांत, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची दिशा देणार आहेत.
या कार्यक्रमात मनःशांती, तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, भावनिक बुद्धिमत्ता, स्वव्यवस्थापन, नातेसंबंधातील सुसंवाद, कर्मसिद्धांत, आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आत्मपरिवर्तन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दरम्यान, २०, २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी तीन दिवसीय मेडिटेशन शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते ८ आणि सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत शिवछत्रपती सभागृह येथे हे शिबिर होणार असून, बी.के. डॉ. दामिनी दीदी मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणीसाठी www.omshanti.in/solapur या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी न केलेल्या नागरिकांनाही मुख्य कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

Related Posts

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत
इतर घडामोडी

गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

November 13, 2026
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

November 13, 2026
नऊ वर्षे बॉम्ब शोधक पथकाची विश्वासू साथीदार! ‘मिरा’ श्वान सेवेतून निवृत्त
इतर घडामोडी

नऊ वर्षे बॉम्ब शोधक पथकाची विश्वासू साथीदार! ‘मिरा’ श्वान सेवेतून निवृत्त

November 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

November 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026