सोलापूर शहरात दमानी नगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम सध्या गतीने सुरू झाले आहे. अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौका कडून रेल्वे ब्रिज कडे जाताना उजव्या बाजूला असलेली एनजी मिलची खूप मोठी जागा रस्त्यासाठी ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्विस रोड सह सुमारे आठ पदरी रस्ता होईल. सुमारे 38 कोटी रुपयांचे हे काम असून रेल्वे ट्रॅकच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्ही बाजूला सर्विस रोड चा समावेश आहे. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या 20 पिलर चे काम पूर्ण झाले आहे. त्यावर सिमेंट गर्डर बसवण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला असलेल्या पिलर वरती नोव्हेंबर महिन्यात रेल्वेचा मेगा ब्लॉक घेऊन लोखंडी गर्डर बसविले जाणार आहेत. दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या कामाने देखील चांगलीच गती घेतली आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक स्वप्निल कासार यांनी देखील जानेवारी महिन्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुलाव होईल असे सांगितले. त्यामुळे बहुप्रतीक्षेत असलेला हा दमाणी नगरचा रेल्वे उड्डाणपूल नव्या वर्षापासून वाहतुकीसाठी खुला होईल हे विशेष.










