• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक पर्यटन दिनानिमित्त भालेवाडी येथे अभ्यास दौरा यशस्वी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2026
in इतर घडामोडी
0
जागतिक पर्यटन दिनानिमित्त भालेवाडी येथे अभ्यास दौरा यशस्वी
0
SHARES
1
VIEWS

एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकसित होत असलेल्या ‘मिल्क अँड मिलेट व्हिलेज’ची कोळे पर्यटन समितीकडून पाहणी

सोलापूर : मंगळवेढा : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित सोलापूर पर्यटन सप्ताहाच्या अनुषंगाने दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी ‘मध, कृषी व ग्रामीण पर्यटन शेतकरी समिती, कोळे’ यांच्या वतीने एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकसित होत असलेल्या ‘मिल्क अँड मिलेट व्हिलेज, भालेवाडी’ येथे अभ्यासात्मक पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास प्रायमुव्ह, पुणे यांचे तांत्रिक सहाय्य लाभत आहे.

ग्रामीण व कृषी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतच विविध गावांमध्ये विकसित होत असलेल्या पर्यटन संकल्पनांचा अभ्यास करून त्या आपल्या गावात राबविण्याच्या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

या दौऱ्यात सहभागी प्रतिनिधींनी भालेवाडी येथील आदर्श गोठे, ऐतिहासिक मामाचा वाडा, धार्मिक व ऐतिहासिक स्थळे, पुरातन आड, जिल्हा परिषद शाळा, सेंद्रिय परसबागा, देशी वृक्षांची रोपवाटिका, पर्यटन पायाभूत सुविधांची कामे तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली आदर्श स्मशानभूमी यांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी भालेवाडी पर्यटन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत दवले, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गायकवाड, पर्यटन मार्गदर्शक नानासाहेब रोंगे तसेच पर्यटन समितीचे सदस्य उपस्थित होते. त्यांनी भालेवाडीमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध पर्यटन उपक्रमांची माहिती सहभागी प्रतिनिधींना दिली.पाहणी दौऱ्यानंतर स्थानिक शेतकरी, पर्यटन समितीचे सदस्य व महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला.

यावेळी कृषी, दुग्ध व्यवसाय, भरडधान्य उत्पादन, स्थानिक संस्कृती व ग्रामीण पर्यटनाची सांगड घालून शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.भालेवाडी येथे विकसित होत असलेल्या विविध पर्यटन उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील स्थानिक संसाधनांना पर्यटनाशी जोडण्याची प्रभावी संधी निर्माण झाली असून, कोळे गावात मध उत्पादन, कृषी व स्थानिक ऐतिहासिक वारशाची सांगड घालून ग्रामीण पर्यटन विकसित करण्यासाठी हा अभ्यास दौरा अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असे मत कोळे येथील पर्यटन समितीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध ‘थीम बेस्ड पर्यटन गावे’ विकसित करण्याच्या उपक्रमाला अशा अभ्यास दौऱ्यांमुळे चालना मिळत असून, गावागावातील स्थानिक वैशिष्ट्ये पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार व शाश्वत विकासाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर करणार

Next Post

हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा

Related Posts

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!
इतर घडामोडी

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026
विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा
इतर घडामोडी

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

September 29, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
इतर घडामोडी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

September 29, 2026
कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात
इतर घडामोडी

कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात

September 29, 2026
हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा
इतर घडामोडी

हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा

September 29, 2026
Next Post
हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा

हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026
विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

September 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026