• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2026
in इतर घडामोडी
0
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक..
0
SHARES
1
VIEWS

सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी 2026 च्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुषंगाने पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान, तर दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कासेकर यांनी उपस्थित प्रतिनिधींना निवडणूक कार्यक्रम, मतदारसंघाची रचना, मतदार यादी तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी, तर जिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 11 उपजिल्हाधिकारी व 12 तहसीलदार निवडणूक प्रक्रियेतील विविध जबाबदाऱ्या पार पाडणार असल्याचे कासेकर यांनी सांगितले.

अंतिम मतदार यादी 4 ऑक्टोबर रोजी
दि. 25 सप्टेंबर 2026 रोजीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 40 हजार 17 मतदार, तर शिक्षक मतदारसंघासाठी 13 हजार 728 मतदार आहेत. त्यानंतर मतदार नोंदणी प्रक्रियेत वाढ झालेली असून, दि. 26 सप्टेंबर 2026 पर्यंत पदवीधर मतदारसंघासाठी 9 हजार 960, तर शिक्षक मतदारसंघासाठी 1 हजार 485 मतदारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी केल्यानंतर अंतिम मतदार यादीत वाढ होणार असल्याचे कासेकर यांनी सांगितले.

सध्या दि. 25 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात 109 मतदान केंद्रे, तर शिक्षक मतदारसंघासाठी 71 मतदान केंद्रे आहेत. दि. 26 सप्टेंबरपर्यंत झालेल्या मतदारवाढीच्या अनुषंगाने दि. 4 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीमध्ये मतदान केंद्रांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंतिम मतदार यादी दि. 4 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, ती सर्व संबंधित राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही उपजिल्हा निवडणूक अधिकारी कासेकर यांनी दिली.

आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कासेकर यांनी केले. निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाला सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी, मतदान केंद्रे आणि इतर आवश्यक निवडणूक तयारीची प्रक्रिया प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी

Next Post

आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

Related Posts

युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर
इतर घडामोडी

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण
इतर घडामोडी

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

September 28, 2026
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

September 28, 2026
सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी
इतर घडामोडी

सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी

September 28, 2026
Next Post
आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

September 28, 2026
युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर

युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर

September 28, 2026
आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026