सोलापूर जिल्हा परिषद तसेच महापालिका कामकाजाचे आणि डी पी डी सी मधील कामाच्या वर्क ऑर्डरीच्या फायली आता कुठे पळू लागल्या होत्या. तोच या विकास कामांना पुन्हा ब्रेक बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधील स्वीकृत सदस्य निवड आता महिनाभर लांबणीवर पडल्या आहेत. डीपीडीसी मधील सुमारे 200 कोटींचे प्रस्ताव लटकले आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्यामुळे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, त्यामुळे महापालिकेचे 1483 कोटीची पाणीपुरवठा योजना, परिवहन समिती सदस्य निवडणे, सोलापूर विमानतळाबाबत एअर कंपन्यांसाठी नव्याने टेंडर काढणे आदी अनेक कामे महिनाभर रखडणार आहेत. पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूर शहरातील होणारे उड्डाणपूल, याबाबत कोणत्याही वर्कऑर्डरी देता येणार नाहीत. त्यामुळे आता प्रत्येकांनाच 28 ऑक्टोबर या आचारसंहिता संपणाऱ्या तारखेपर्यंत वेटिंग करावे लागणार आहेत. त्यामुळे उर्वरित पाच महिन्यात डीपीडीसी मधून मिळणारा निधी खर्च करणे प्रशासनासमोर मोठे चॅलेंज असणार आहे.










