• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2026
in इतर घडामोडी
0
देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!
0
SHARES
2
VIEWS

देशासाठी आपल्या आयुष्यातील तब्बल २४ वर्षे ३० दिवस समर्पित करून, भारतीय सैन्य दलातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झालेले पंढरपूरचे सुपुत्र हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचे पंढरपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘वर्दीचा सन्मान… तिरंग्याचा अभिमान!’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्याने संपूर्ण पंढरपूरचे वातावरण देशभक्तीने भारावून गेले. ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पंढरपूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.पंढरपूर रेल्वे स्टेशनपासून स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भक्ती मार्ग परिसरातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिक, युवक, माजी सैनिक आणि मित्रपरिवार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

‘भारत माता की जय!’…’वंदे मातरम्!’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.त्यानंतर गाडगेबाबा चौक येथील विराट मंगल कार्यालयात हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा मान्यवर, माजी सैनिक, अधिकारी, मित्रपरिवार नागरिकांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. २ ऑगस्ट २००२ रोजी भारतीय सैन्य दलातील ‘कोर ऑफ सिग्नल’मध्ये दाखल झालेल्या विक्रम नाईकनवरे यांनी तब्बल २४ वर्षे देशसेवा केली.

सेवाकाळात त्यांनी देशाच्या विविध भागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
पंजाबमध्ये अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. तसेच ड्रिल इन्स्ट्रक्टर आणि डब्ल्यू.टी. उस्ताद म्हणून जवानांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्यांनी प्रभावीपणे सांभाळली. हिमाचल प्रदेश, गोवा आणि पंजाब यांसह विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे, देशसेवा बजावत असतानाच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नव्याने सैन्यात दाखल होणारे रिक्रूट, अग्निवीर आणि ज्युनिअर लीडर यांना लष्करी प्रशिक्षण देण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना पुढील पिढीतील जवान घडवण्याचे काम करणाऱ्या या सैनिकाचा पंढरपूरकरांनी केलेला सन्मान निश्चितच अभिमानास्पद ठरला. सत्काराला उत्तर देताना हवालदार विक्रम नाईकनवरे भावूक झाले.

आई-वडिलांची प्रेरणा आणि आजीच्या आशीर्वादामुळेच आपण देशसेवेचे हे खडतर कर्तव्य यशस्वीपणे पार पाडू शकलो, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील युवकांना एक महत्त्वाचे आवाहनही केले. “मी सर्व महाराष्ट्रातील युवकांना एक आव्हान आणि नम्र विनंती करतो की, प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे. जय हिंद!”असे आवाहन करत त्यांनी युवकांनी देशसेवेकडे वळण्याचे आवाहन केले.

देशसेवा करताना आपल्या कुटुंबीयांनी दिलेल्या साथीची आठवणही त्यांनी यावेळी आवर्जून काढली. “मी देशसेवा करत असताना माझ्या सर्व नातेवाईकांनी माझ्या घराकडे लक्ष दिले. मी सीमेवर काम करत असताना माझ्या नातेवाईकांनी, पाहुण्यांनी, मित्रमंडळींनी आणि संपूर्ण परिवाराने माझ्या कुटुंबाची काळजी घेतली. त्यांनी आपल्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता आभार व्यक्त केले.

या सोहळ्याचे आयोजन त्यांचे बंधू दीपक राजाराम नाईकनवरे, स्व. राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था, संतपेठ पंढरपूर, तसेच पंढरपूर-मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक, अधिकारी, नागरिक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. देशाच्या सीमेवर २४ वर्षे तिरंग्याची शान जपणाऱ्या या वीर सुपुत्राला पंढरपूरकरांनी दिलेला सन्मान म्हणजे केवळ एका सैनिकाचा गौरव नाही… तर संपूर्ण सैनिक वर्गाच्या त्यागाला आणि देशसेवेला दिलेली मानवंदना आहे! स्नेहभोजनाने या शानदार सोहळ्याची सांगता झाली.वर्दी उतरली… पण देशसेवेची भावना कायम राहिली!

Previous Post

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

Next Post

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

Related Posts

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
Next Post
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026