स्थानिक गुन्हे शाखेकडुन उल्लेखनीय कामगिरी.घरफोडी करणारा व जबरी चोरी मधील पाहिजे सराईत गुन्हेगार अटक, ०२ नविन गुन्हे उघड, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साडया व १ मोटार सायकल,असा मुद्देमाल जप्त,
दिनांक दि. २४/०८/२०२६ रोजी २२/०० वा ते २५/०८/२०२६ रोजी ०७/०० वा च्या सुमारास कासेगाव ता. दक्षिण सोलापूर येथील अज्ञात चोरटयांनी तीन ते चार घरफोडी करून चोरी केल्याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं ५०७/२०२६ भा. न्या. सं. कलम ३३१ (३), ३३१ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर चोरीमुळे गावात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर गुन्हयाचे गार्भीय लक्षात घेता, मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक, संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करणेबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणेकामी आदेशीत केले होते.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि / भिमगोंडा पाटील व त्यांचे पथक हे घरफोडी झालेले कासेगाव ता. दक्षिण सोलापूर येथील घटनास्थळी भेट दिली. पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी कासेगाव मधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली. सदर पथकास घटनेच्या मध्य रात्रौ ३ अज्ञात इसम सीसीटीव्ही फुटेज मध्ये संशयीत रित्या फिरताना दिसुन आले. तदनंतर सपोनि / भिमगोंडा पाटील यांचे पथकातील अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले असता, गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा नितीन बाबु भोसले, कमलाकर यशवंत पवार व विरप्पा चंदु शिंदे सर्व राहणार बिस्मील्ला नगर, मुळेगाव ता दक्षिण सोलापूर यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सपोनि / भिमगोंडा पाटील हे पोलीस पथकासह बिस्मील्लानगर मुळेगाव येथे जावुन नमुद आरोपी यांचे शोध घेतले असता, आरोपी नामे नितीन बाबु भोसले, कमलाकर यशवंत पवार दोघे रा. बिस्मील्लानगर, मुळेगांव सोलापुर, हे मिळुन आल्याने त्यांचेकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.आहे. नमुद आरोपी यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करता त्यांनी त्याचे साथीदारासह खालील गुन्हे केल्याची कबुली दिली
अ.कं
पोलीस ठाणे
१
गुरनं / बीएनएस कलम
सोलापूर ता
५०७/२०२६ भा.न्या.सं. कलम ३३१ (३), ३३१ (४),३(५)
२ माढा
१०१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५
आरोपी नामे १) नितीन बाबु भोसले, २) कमलाकर यशवंत पवार दोघे रा. बिस्मील्लानगर, मुळेगांव सोलापुर, यांचेकडुन वरील पोलीस ठाणेच्या गुन्हयातील चोरीस गेल्या मुद्देमाल पैकी ३ ग्रॅम ४८ मिली सोन्याचे दागिने रक्कम ४५,०००/- रू. (बाजार भाव), रोख रक्कम २०,०००/-, इरकल साडया रू. ३०००/- तसेच गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण ७८,०००/- रू मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. नमुद आरोपी हे सध्या मा. न्यायालयीन कोठडीत आहेत. पुढील तपास सपोनि / भिमगोंडा पाटील नेम. स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहे.
सदर आरोपीत याचे गुन्हे अभिलेख पाहता खालील गुन्हयात पाहिजे आरोपी आहे.
अ.कं
आरोपी चे नाव व स्थिती
पोलीस ठाणे
गुरन
9
नितीन बाबु भोसले (पाहिजे)
वळसंग
६२३/२०२५ बीएनएस कलम ३०९ (६) ३(५)
२
३
कमलाकर यशवंत पवार (अटक)
वळसंग
६२३/२०२५ बीएनएस कलम ३०९ (६) ३(५)
कमलाकर यशवंत पवार (अटक)
वळसंग
४
१०९/२०२४ भादवि क ३८०, ४५४, ४५७
कमलाकर यशवंत पवार (पाहिजे)
वळसंग
२४९/२०२३ भादवि क ३८०, ४५७
५
कमलाकर यशवंत पवार (पाहिजे)
तामलवाडी जि.धाराशिव
६
११६/२०२४ बीएनएस क. ३३१ (४) ३०५(४)
कमलाकर यशवंत पवार (अटक)
तामलवाडी जि.धाराशिव
७
०३/२०२५ बीएनएस क. ३३१ (४) ३०५(४)
८
कमलाकर यशवंत पवार (अटक)
अ. कोट उ.
१५६/२०२४ भादवि क ३८०, ४५७
कमलाकर यशवंत पवार (अटक)
९
मोहोळ
३५२/२०२२ भादवि क ३७९. ३४
कमलाकर यशवंत पवार (अटक)
आर्दशनगर विजापुर कर्नाटक
१२३/२०२४ बीएनएस क. ३३१ (४) ३०५(४)
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, भिमगोंडा पाटील व पथकातील, पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, अजय भोसले, पोकॉ/सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, अनवर अत्तार, सुनंदा झळके, चापोकों / दिलीप थोरात तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोहवा / शशीकांत काळेकर यांनी बजावली.











