सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात ‘The SEED – Sustainable Eco-Enterprise District’ हा महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञान प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पात तब्बल 1.4 GW क्षमतेचे हायपरस्केल AI डेटा सेंटर उभारण्याची योजना आहे. डेटा सेंटरसाठी सुमारे 1.13 लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यातून सुमारे 1,000 कायमस्वरूपी रोजगार निर्माण होण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी उजनी जलाशयात सुमारे 2 GW क्षमतेचा Floating Solar प्रकल्प प्रस्तावित आहे. तसेच 1,000 MW क्षमतेची Battery Energy Storage System उभारण्याची योजना आहे. या कॅम्पसमध्ये AI, Cloud Computing, Agritech आणि Climate Analytics यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असेल.
याशिवाय शिक्षण, प्रशिक्षण आणि R&D केंद्रे विकसित करण्याची संकल्पना आहे. प्रकल्पात Green Hydrogen निर्मिती प्रकल्पाचाही समावेश प्रस्तावित आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार आणि जेडब्ल्यू व सीड यांच्यात 16 एप्रिल 2026 रोजी सामंजस्य करार झाला आहे. उजनी परिसराला भविष्यातील AI, हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचे केंद्र बनवण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे भविष्यात उजनी हा महा काय प्रकल्प फक्त पाणीच देणार नसून भारताला ऊर्जा तसेच एआय तंत्रज्ञान देखील पुरवणार आहे.











