• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 15, 2026
in इतर घडामोडी
0
गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा
0
SHARES
0
VIEWS

शहरातील विविध विसर्जन कुंडांची पाहणी; आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

सोलापूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध विसर्जन स्थळांवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. या तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर तथा प्रथम नागरिक श्री विनायक कोंड्याल यांनी आज शहरातील विविध विसर्जन कुंड व विसर्जन स्थळांची पाहणी केली.

महापौर विनायक कोंड्याल यांनी प्रथमतः सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाट व विष्णू घाट येथे पाहणी करून गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली. त्यानंतर तुळजापूर रोड येथील खान, माढा विहीर तसेच धर्मवीर संभाजी तलाव या प्रमुख विसर्जन स्थळांची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक ठिकाणी गणेशभक्तांना विसर्जनाच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तुळजापूर रोड येथील खान परिसरात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने या ठिकाणी विशेष नियोजन करण्याच्या दृष्टीने महापौरांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती व वाहतूक व्यवस्थापन, प्रकाश व्यवस्था, बॅरिकेडिंग तसेच जीव रक्षकांची नियुक्ती याबाबत महापौरांनी आढावा घेतला. विसर्जनाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जीव रक्षकांची पुरेशी व्यवस्था ठेवण्याबरोबरच आवश्यक सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विसर्जन स्थळांवर गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने नागरिकांना सहज व सुरक्षितपणे विसर्जन करता यावे, यासाठी प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग, स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, बॅरिकेडिंग, वाहतूक नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

यावेळी महापौर श्री विनायक कोंड्याल म्हणाले, “सोलापूर शहरातील गणेश विसर्जनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बहुतांश तयारी पूर्ण झाली असून, विसर्जनापूर्वी उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि गणेश विसर्जन उत्साहपूर्ण तसेच सुरक्षित वातावरणात पार पडावे, यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. विशेषतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्जन होते, त्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि सुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.”

गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील प्रमुख विसर्जन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

या पाहणी दौऱ्यावेळी नगर अभियंता नीलकंठ मतपती, प्रकाश दिवांजी, विभागीय अधिकारी विजय लोखंडे, विभागीय अधिकारी एम.बक्षी, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, विभागीय अधिकारी राघवेंद्र गायधनकर, मनोज जाधव, चेतन प्रचंडे, शेखर सकट, भास्कर सामलेटी यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

Next Post

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

Related Posts

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा
इतर घडामोडी

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!
इतर घडामोडी

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026
देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन
इतर घडामोडी

देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन

September 14, 2026
विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
इतर घडामोडी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026
Next Post
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026