सोलापूर- मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व्दारा निर्धारीत, आणि मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये आणि सार्वजनिक न्यास नोंदणी तथा धर्मादाय कार्यालय, सोलापूर यांच्या सौजन्याने जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, सोलापूर आणि सोलापूर जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने बंदयांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजीत करण्यात आले होते.या कार्यकमाचे उदघाटन मा. न्या. धर्मादाय उपआयुक्त ईश्वर सुर्यवंशी यांचे हस्ते झाले. धर्मादाय विभागाचा उद्देशच सामाजीक न्याय आहे. कारागृहातील बंदयांच्या सुधारणेसाठी आरोग्य आणि कायदयाचे ज्ञान दोन्ही आवश्यक आहे. हा उपक्रम सर्वांना न्यायाची समान उपलब्धता या संकल्पनेला बळ देणारा आहे, असे अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले.जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचिव मा.न्या. अमोलकुमार देशपांडे यांनी बंद्याना गुन्हयाची कबुली देवून शिक्षेत सवलत मिळविण्याची प्रक्रीया याविषयी विस्तृत स्वरूपात माहिती देवून ही कायदयातील एक महत्त्वाची तरतूद आहे, असे सांगितले
जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे विधीज्ञ अॅड.अंजली बावरे यांनी बंदयांना जामीनाचा अधिकार, जामीनाच्या तरतूदी याविषयी माहिती दिली आणि विधीज्ञअॅड. मुफक्कम जहागीरदार यांनी अटकेतील व्यक्तींचे अधिकार याविषयी माहिती दिली.कारागृह अधीक्षक सुशिल कुंभार यांनी प्रस्तावना व मान्यवरांचे स्वागत करताना, बंदयांच्या आरोग्याची काळजी घेणे व बंदयांना कायदेशीर हक्क मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असून अशा शिबीरांमुळे बंदी बांधवांमध्ये सकारात्मकता येत असल्याचे सांगितले,
सोलापूर जिल्हयातील नामांकीत अश्वीनी हॉस्पीटल, कुंभारी येथील डॉ. अविनाश सुलताने, डॉ. मयुर हांगे, डॉ. धीरेंद्र लोहकरे, डॉ. ताहिरा मुजावर, डॉ. साधना साळवे, बिलाल नंल्लामंदु आणि त्यांचे सहकारी यांनी बंदीजनांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार केले.युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, सोलापूर येथील होमिओपॅथीचे तज्ञ डॉ. ओवेस इनामदार, डॉ. विशाखा साळवे आणि पौरवी शिक्षण प्रसारक मंडळ, महिला होमिओपॅथी मेडीकल कॉलेज आणि हॉस्पीटल मध्ये शिक्षण घेतलेल्या 17 विदयार्थीनी बंदयांची आरोग्य तपासणी करून होमिओपॅथीची औषधी दिली.
तसेच सोलापूर जिल्हयातील कॅन्सर उपचारासाठी प्रसिध्द असलेले श्री सिध्देश्वर कॅन्सर सोसायटीचे डॉ. स्मिता बूब, जयश्री बिराजदार, पियुषा देशपांडे, संगीता पारशेटटी आणि वंदना टोणपे यांनी कारागृहातील सर्व महिला बंदयांची कॅन्सर आजाराची तपासणी केली.
सदर कार्यकमाचे सुत्रसंचालन कारागृह शिक्षक अंगद गव्हाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे लिपीक सुजय हसरमनी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वरिष्ठ तुरूंगाधिकारी बिरू खळबुटे, तुरूंगाधिकारी विठठल शिंदे, सुभेदार आकाराम कांबळे, हवालदार नीलकंठ खाडे यांनी सहकार्य केले.अशी माहिती अधिक्षक कारागृह वर्ग 2- सुशील कुंभार यांनी दिली आहे.










