सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येते की, आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर या निवासी शाळेसाठी अनुभवी व शिस्तप्रिय माजी सैनिकांची तातडीने आवश्यकता आहे.
सदर शाळेत खालील पदांसाठी भरती करण्यात येत आहे.
1) ड्रिल इन्स्ट्रक्टर – 02 पदे
पात्रता : माजी सैनिक / जेसीओ / एनसीओ / नायब सुभेदार / हवालदार उमेदवारांना प्राधान्य. ड्रिल, पीटी व विद्यार्थ्यांच्या शारीरिक प्रशिक्षणाचे ज्ञान आवश्यक.
2) पीटी इन्स्ट्रक्टर – 02 पदे
पात्रता : माजी सैनिक / जेसीओ / एनसीओ / नायब सुभेदार / हवालदार उमेदवारांना प्राधान्य. ड्रिल, पीटी व विद्यार्थ्यांच्या शारीरिक प्रशिक्षणाचे ज्ञान आवश्यक.
3) मेडिकल असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट (माजी सैनिक) – 01 पद
पात्रता : आर्मी मेडिकल असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट / एएमसीमधील अनुभव अपेक्षित.
4) मेडिकल सुपरवायझर / मेडिकल इन-चार्ज – 01 पद
पात्रता : फर्स्ट एड, प्राथमिक आरोग्य सेवा, वैद्यकीय नोंदी व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता.
सदर पदांसाठी माजी सैनिक, जेसीओ, एनसीओ, नायब सुभेदार, हवालदार तसेच आर्मी मेडिकल असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट, एएमसीमधील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षण, शिस्त, नेतृत्वगुण तसेच सैनिकी मूल्यांचे प्रशिक्षण देण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य राहील. ही नोकरी निवासी स्वरूपाची असून निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला सीव्ही / बायोडेटा व्हॉट्सॲपद्वारे मोबाईल क्रमांक 9552777725 वर पाठवावा.
तरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक माजी सैनिकांनी सदर संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.











