सोलापूर: साहित्य सेवा संघ, सोलापूर यांच्या वतीने आयोजित कवयित्री अनुराधा विभुते लिखित ‘माऊलीची कुशी’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि विविध पुरस्कार वितरण समारंभ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन व काव्यसंग्रहाचे प्रकाशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मनोरमा परिवाराचे प्रमुख व ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे उपस्थित होते, तर ईश्वरपूर (जि. सांगली) येथील ज्येष्ठ कवी व लेखक प्रदीप पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी साहित्य आणि समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

जीवनगौरव पुरस्कार:डॉ. लक्ष्मण कार्ले (कर्मण्यवादी, चैतन्यमूर्ती)
साहित्यसेवा पुरस्कार:
प्रकाश जडे (ज्येष्ठ साहित्यिक, मंगळवेढा)
प्राचार्या डॉ. नसीमा पठाण (ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर)
योगीराज वाघमारे (ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर)
गोविंद काळे (ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर)
संध्या धर्माधिकारी (ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर)
उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: प्राचार्य डॉ. शंकर नवले (एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष तथा ज्ञानदान प्रकाशन संस्थेचे संस्थापक दत्तात्रय इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमास साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, रसिक वाचक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








