• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2026
in Blog
0
सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा
0
SHARES
4
VIEWS

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न

माढा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, म्हैसगाव (मुले) या पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सेवा भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या नूतन स्वच्छतागृहाचा लोकार्पण व हस्तांतरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या नूतन स्वच्छतागृहाचे लोकार्पण व हस्तांतरण मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर कुशल जैन (भा.प्र.से.) तसेच जिल्हा संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर, डॉ. रमेश सिद्ध यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेता यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने सेवा भारतीच्या वतीने स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषदेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींच्या मनमोहक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली आणि कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.मान्यवरांची प्रमुख उपस्थितीया सोहळ्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक), विशाल मुळे, तहसीलदार माढा संजयजी भोसले, गटविकास अधिकारी, कुर्डूवाडी महेश सुळे तसेच गटशिक्षणाधिकारी कुर्डूवाडी श्रीधर भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी आपल्या मनोगतात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर कुशल जैन (भा.प्र.से.) यांनी म्हैसगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार *शिक्षणासोबतच आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी पोषक, सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शाळेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच सेवा भारतीच्या वतीने सामाजिक व व्यवस्थापन प्रमुख सदानंद कुलकर्णी, सचिव प्रदीपजी स्वप्नील आणि सहसचिव प्रदीपजी देशपांडे उपस्थित होते. त्यांनी या सामाजिक उपक्रमामागील भूमिका व उद्देश याबाबत माहिती दिली.ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग स्थानिक पातळीवर सरपंच,ग्रामपंचायत म्हैसगाव मा. मुकुंद उबाळे, अध्यक्ष, शालेय समिती मा. धनुसिंह राजपूत आणि केंद्रप्रमुख मा. प्रमोद खरटमल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि समस्त म्हैसगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर, कुशल जैन यांनी संपूर्ण शाळेची सविस्तर पाहणी केली. त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, शालेय परिसर तसेच वर्गातील शैक्षणिक सजावटीची पाहणी केली.

शाळेतील स्वच्छता, वर्गांची आकर्षक सजावट आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेले आनंददायी शैक्षणिक वातावरण पाहून कुशल जैन यांनी समाधान व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका कांदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख प्रमोद खरटमल यांनी केले.

Previous Post

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

Next Post

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
Blog

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन
Blog

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

August 19, 2026
प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!
Blog

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…
Blog

महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…

August 19, 2026
Next Post
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026