• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2026
in इतर घडामोडी
0
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
0
SHARES
4
VIEWS

शाळा नको, तुमचा महापौर बंगला विका!

प्रतीकात्मक मनपा जागा विक्री करून विद्यार्थ्यांना भीक मागायला लावण्याचे आंदोलन

सोलापूर- सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महानगरपालिकेचा स्वनिधी उभारण्याच्या नावाखाली महानगरपालिकेच्या शाळा व मोक्याच्या सार्वजनिक जागा बीओटी तत्त्वावर देण्याचा किंवा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रतीकात्मक पद्धतीने मनपाची जागा विक्री करण्याचे नाटक करून विद्यार्थ्यांना भीक मागायला लावण्यात आले. महानगरपालिकेच्या मालमत्ता विकून किंवा खासगी विकासकांना बीओटीवर देऊन पैसा उभारला तर त्याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांच्या आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याला बसणार आहे, हा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

“शाळा विकून पाणी नको; विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!”

पाणीपुरवठा हा सोलापूरकरांचा मूलभूत हक्क आहे. शहराला पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळायलाच हवा. मात्र, त्यासाठी शाळा, मैदाने, बागा आणि सार्वजनिक उपयोगाच्या मोक्याच्या जागा खासगी विकासकांच्या ताब्यात देणे हा विकासाचा मार्ग असू शकत नाही.महापालिकेच्या शाळांमध्ये सामान्य, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. आज शाळेची जागा विकण्याचा निर्णय घेतला तर उद्या या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जागा शोधावी लागेल.महापालिकेच्या शाळा या केवळ इमारती किंवा जमिनीचे तुकडे नाहीत; त्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या सार्वजनिक संपत्ती आहेत.महापौरांनी शाळांकडे मालमत्ता म्हणून नव्हे, विद्यार्थ्यांचे भविष्य म्हणून पाहावे!

पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उभारण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शासनाकडून निधी, कर्ज, मनपाच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत, थकीत कर वसुली, अनावश्यक खर्चाला आळा आणि मनपाच्या निष्क्रिय मालमत्तेचा योग्य आर्थिक वापर यांचा विचार करण्याऐवजी शाळा आणि मोक्याच्या सार्वजनिक जागा बीओटीवर देण्याचा मार्ग का निवडला जात आहे? याचे उत्तर महापालिका प्रशासनाने आणि महापौरांनी सोलापूरकरांना द्यावे.

मालमत्ता विकायचीच असेल तर सुरुवात महापौर बंगल्यापासून करा!जर महानगरपालिकेची मालमत्ता विकणे हाच निधी उभारण्याचा मार्ग असेल, तर सर्वप्रथम महापौरांचा बंगला आणि पदाधिकाऱ्यांच्या अनावश्यक सुविधांचा त्याग करण्याची तयारी दाखवा.सोलापूरच्या विद्यार्थ्यांची शाळा विकून पाणीपुरवठा योजना उभारण्यापेक्षा महापौरांचा बंगला विकून निधी उभारण्याचा निर्णय घ्या!

महापालिकेच्या मुलांच्या शिक्षणाची जागा वाचवण्यासाठी आम्ही हा संघर्ष उभारणार आहोत.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या

  1. महानगरपालिकेच्या शाळा कोणत्याही परिस्थितीत विक्री किंवा बीओटीच्या प्रस्तावातून वगळाव्यात.
  2. शाळा, मैदाने, बागा आणि सार्वजनिक उपयोगाच्या जागांचे खासगीकरण तात्काळ थांबवावे.
  3. बीओटीसाठी प्रस्तावित सर्व जागांची मालकी, क्षेत्रफळ, बाजारमूल्य, रेडीरेकनर मूल्य आणि बीओटीचा कालावधी जाहीर करावा.
  4. पाणीपुरवठा योजनेसाठी स्वनिधी उभारण्याचे पर्यायी मार्ग स्पष्ट करावेत.
  5. महानगरपालिकेच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणावे.
  6. महापालिकेच्या मालमत्तांबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नागरिक, पालक, विद्यार्थी आणि संबंधित घटकांशी सार्वजनिक चर्चा करावी.

“शाळा विकू नका, विद्यार्थ्यांचे भविष्य विकू नका!”

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या प्रतीकात्मक मनपा जागा विक्री व विद्यार्थ्यांना भीक मागायला लावण्याच्या आंदोलनातून महानगरपालिकेला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, सार्वजनिक मालमत्ता ही कोणत्याही सत्ताधाऱ्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही. ती सोलापूरकरांची संपत्ती आहे.

पाणी हवे — पण शाळा विकून नाही!
विकास हवा — पण विद्यार्थ्यांचे भविष्य विकून नाही!
मनपाची मालमत्ता विकायचीच असेल — तर शाळा नको, तुमचा महापौर बंगला विका!

हा प्रस्ताव मागे घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागरिक, पालक, विद्यार्थी व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन अधिक तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

– आतिश बनसोडे,महेश जाधव,नरेंद्र शिंदे,सुहास सावंत,विनोद इंगळे,गौतम थापटे,मनोज भालेराव,प्रज्वल प्रसन्न,शाहिद शेख, आदि उपस्थितीत होते.

Previous Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

Next Post

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

Related Posts

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
Next Post
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026