• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

Yes News Marathi by Yes News Marathi
August 11, 2026
in इतर घडामोडी
0
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दि. ३१ जुलै २०२६ रोजी सोलापूर महानगरपालिकेस भेट देऊन महानगरपालिकेमार्फत नागरिकांना लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवांची पाहणी व आढावा घेतला.यावेळी सोलापूर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना एकूण १४८ नागरी सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. नागरिकांना पारदर्शक, सुलभ व वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने विकसित केलेल्या संगणकीकृत प्रणालीचे सुधाकर तेलंग यांनी विशेष कौतुक केले.

सोलापूर महानगरपालिकेमार्फत प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या अर्जांपैकी सुमारे ९८ टक्के अर्ज विहित कालमर्यादेत निकाली काढले जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले. नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगिरी उल्लेखनीय असल्याचे राज्य आयुक्तांनी नमूद केले.
महानगरपालिकेने विकसित केलेली ऑनलाईन संगणक प्रणाली सर्वोत्कृष्ट व प्रभावी असल्याचे तेलंग यांनी गौरवोद्गार काढले. सदर प्रणालीचा इतर महानगरपालिकांमध्येही अवलंब अथवा विस्तार करण्यात आल्यास नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत लोकसेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले.

सोलापूर महानगरपालिकेच्या लोकसेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांनी महानगरपालिका आयुक्त व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. नागरिककेंद्रित प्रशासन, डिजिटल सेवा आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेने केलेली ही कामगिरी इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन

Next Post

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Related Posts

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक
इतर घडामोडी

731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

August 11, 2026
Next Post
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026