देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अत्यंत धक्कादायक आणि मोठे खुलासे केले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या तज्ज्ञांनीच पैशांच्या हव्यासापोटी पेपर लीक केल्याचे तपासात समोर आले. पुणे, लातूरपासून ते राजस्थानमधील सीकरपर्यंत पसरलेल्या या रॅकेटमध्ये कोचिंग क्लासेसचे संचालक, एजंट आणि पालकांचा मोठा सहभाग असल्याचे सीबीआयने सांगितले. या प्रकरणात सीबीआयने दिल्लीच्या विशेष न्यायालयात २० हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या तीन विषयतज्ज्ञांनीच पदाचा गैरवापर करून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका बाहेर वळवल्याचा आणि त्या लाखो रुपयांना विकल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे.








