सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांच्या विभागाकडून आषाढी वारीनिमित्त साठ हजार वारकऱ्यांना चष्मे वाटप करण्यासाठी 50 लाख रुपयांचे काढलेले टेंडर संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. 18 जुलै रोजी 49 लाख 99 हजार 950 रुपयांचे ई टेंडर काढण्यात आले. 22 जुलै रोजी याबाबत प्री-बीड मीटिंग घेण्यात आली. तर 25 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 24 जुलै रोजी या चष्मे वाटपाची वर्क ऑर्डर देण्यात आली. वास्तविक पाहता हे चष्मे वारकऱ्यापर्यंत पोहोचलेच नसून गेल्या वर्षीच्या आषाढी वारीतील शिल्लक राहिलेलेच बारा ते पंधरा हजार चष्मे वाटप करण्यात आले आहेत. एवढ्या उशिरा का टेंडर काढले, हे चष्मे नक्की कोठे ठेवले याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कोपूडकर यांना देखील माहिती नाही. याचे बिल एन आर एच एम मधूनच दिले जाणार आहे मात्र हा विषय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील असल्याचे त्यांनी सांगितले. हे संपूर्ण टेंडर संशयाच्या भोवऱ्यात असून जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी देखील याची चौकशी करू असे सांगितले.










