• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबई हायकोर्टाच्या विनंती मुळे सोमवारी 20 जुलै रोजी नियोजित निमा डॉक्टरांचा संप रद्द

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2026
in Blog
0
मुंबई हायकोर्टाच्या विनंती मुळे सोमवारी 20 जुलै रोजी नियोजित निमा डॉक्टरांचा संप रद्द
0
SHARES
17
VIEWS
      डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिकेच्या रुग्णालयात कर्तव्य बजावत असताना डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष व हिंसक हल्ल्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रुग्णसेवेत व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील हा हल्ला केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर झालेला आघात आहे. या गंभीर घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), महाराष्ट्र राज्य शाखेने आणि सोलापूर शाखेने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु माननीय मुंबई हायकोर्टाने सुमोटो अंतर्गत स्वतः दखल घेऊन गुन्हेगार रमेश म्हात्रे व त्याच्या साथीदारांना खालच्या कोर्टाने दिलेला जामीन तात्काळ काल शनिवारी दुपारी रद्द केला आणि सर्व वैद्यकीय संघटनांना संप न करण्याची विनंती केली.
           त्यामुळे, माननीय हायकोर्टाच्या विनंतीला मान देऊन सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपासून ते मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंत (२४ तास) राज्यभरातील सर्व नियमित आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने रद्द केला आहे. त्यामुळे सोमवारी 20 जुलै रोजी सर्व नियमित ओपीडी (OPD) सेवा काळ्याफिती लावून व इतर सर्व वैद्यकीय सेवा पूर्णपणे चालू राहतील, असे निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर आणि निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी यांनी सांगितले.

       निमा महाराष्ट्र शाखा आणि सर्व वैद्यकीय संघटनांनी घेतलेला संपाचा निर्णय रुग्णांच्या विरोधात नसून, डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व निर्भय कार्यस्थळ मिळवून देण्यासाठी घेण्यात आला होता.

             माननीय मुंबई कोर्टाच्या विनंती नंतर निमा संघटनेने आता संप न करता फक्त स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोशींवर तात्काळ कठोर कारवाई करणे, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात कायद्यात प्रभावी सुधारणा करणे, सदर खटले जलद गतीने चालविणे, अशा खटल्यांयांमध्ये राजकीय हस्तक्षेप  दिसल्यास इतर राजकीय नेत्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करणे, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कामावेळी २४ तास सुरक्षा व्यवस्था पुरविणे, सेंट्रल कॉम्प्रेहेन्सीव हेल्थकेअर वायलेंस प्रिवेन्शन कायदा तातडीने लागू करावे, डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना निर्भय वातावरणात सेवा देण्याची कायदेशीर हमी व अखंड सुरक्षिततेची हमी देणारी व्यवस्था तात्काळ लागू करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन सोलापूर निमा संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांना काळ्याफिती लावून देण्यात येणार आहे . प्रशासनाकडून तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात  बेमुदत आंदोलनाचा कडकइशारा निमा संघटनेमार्फ़त देण्यात आला आहे.
Previous Post

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत

Next Post

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

Related Posts

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात
Blog

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे
Blog

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार
Blog

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

July 20, 2026
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..
Blog

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..

July 20, 2026
‘संवाद वारी’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; योजनांची घेतली माहिती
Blog

‘संवाद वारी’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; योजनांची घेतली माहिती

July 20, 2026
धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत
Blog

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत

July 19, 2026
Next Post
TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026