• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- महाराष्ट्र शहरी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पुनर्वापर कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच सोलापूर शहरासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या.

बैठकीत विभागीय क्रमांक १ मधील प्रभागा ४,५, ६ येथील नगरसेवक यावेळी उपस्थिती होते.१३७८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे, प्रत्येक नागरिकापर्यंत समान व पुरेसा पाणीपुरवठा पोहोचविणे, पाण्याची गळती रोखणे, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.तसेच संबंधित प्रभागांमध्ये प्रस्तावित पाण्याच्या टाक्या, नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलकुंभांची ठिकाणे, जुन्या व जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्यांचे पुनर्बांधणी अथवा बदल, नवीन जलवाहिन्या,विद्यमान पाईपलाईनचे मजबुतीकरण व विस्तार, वितरण नेटवर्कमधील सुधारणा यासंदर्भातील सविस्तर माहिती नगरसेवकांना सादरीकरणाद्वारे देण्यात आली. प्रभागनिहाय नियोजित कामांचा आराखडा, त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती आणि कामांच्या अंमलबजावणीची रूपरेषा यावरही चर्चा करण्यात आली.

महापौर विनायक कोंडयाल यांनी उपस्थित नगरसेवकांच्या सूचना व शिफारशी जाणून घेतल्या. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये, सर्व भागांना समान व नियोजनबद्ध पाणीपुरवठा मिळावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तातडीने राबवून कामांना गती देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

यानंतर झोन क्रमांक २ अंतर्गत प्रभाग क्रमांक १, २ व ३ मधील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या भागातील पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांतील विविध बाबी महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्या. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता ताई चाकोते, नगरसेविका तथा अध्यक्ष रोहिणी ताई तळवळकर, नगरसेवक आनंत जाधव, नगरसेवक बिजू प्रधाने,नगरसेवक समाधान आवताडे, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका श्रद्धा पवार, नगरसेविका अलका भवर, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील,नगरसेवक राजू पाटील, नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, नगरसेवक गौतम कसबे, नगरसेविका राजश्री कणके, नगरसेविका पूनम काशीद,ज्ञानेश्वर कारभारी,दत्तात्रय बडगु, किरण पवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी-१ चे सुनीता हिबारे,विभागीय अधिकारी -२ चे सरकाझी सहाय्यक अभियंता शाम कन्ना राउफ शेख,एच मुजावर, समीर जोशी, शशिकांत भुदे किशोर पत्तेवाले, अमर फारूक बागवान, मधुकर साळुंखे, सुचिता अमेणगी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत १३७८ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, तांत्रिक बाबी आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेमुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन, शाश्वत व समान पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

Next Post

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026