• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 9, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
0
SHARES
11
VIEWS

सोलापूर :- आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी भागात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व आशा वर्कर, आरोग्य सेवक आणि सेविका यांना या कायद्याचे काटेकोरपणे प्रशिक्षण द्यावे. तसेच आरोग्य विभागाने जिल्हा दक्षता समितीच्या पुढील बैठकीपूर्वी या कायद्याअंतर्गत किमान एक डिकॉय केस व दोन स्टिंग ऑपरेशन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पीसीपीएनडीटी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकृष्णा सकट, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी दिनेश राठोड, क्लस्टर प्रिव्हेन्शन ऑफिसर ब्रह्मदेव श्रीमंगले, श्री नीरज महाजन, मानसी भोसले, सीनियर मेडिकल ऑफिसर डॉ. अग्रजा चिटणीस यांचेसह सर्व संबंधित आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन म्हणाले की, गर्भधारणा पूर्व व प्रसवपर्व निदान तंत्र निवडीस प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेचे काम व्यवस्थित नाही. सन 2025 मध्ये चार डिकॉय केस करण्यात आलेल्या होत्या, परंतु त्यातील एकही केस यशस्वी झालेली नाही. हे आरोग्य यंत्रणेचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील बैठकीपूर्वी यामध्ये शंभर टक्के सुधारणा करून एक डीकाय व दोन स्टिंग ऑपरेशन यशस्वीपणे करावेत, असे निर्देश ही त्यांनी दिले.

  सद्यस्थितीतील दहा चालू केसेसचा आढावा जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी घेऊन दिसमिस झालेल्या 11 केसेसचा अभ्यास विधी अधिकारी यांनी करावा व या केस कशा पद्धतीने पुन्हा उभा राहू शकतील यासाठी भक्कम आधार सुचवावेत व त्या अनुषंगाने पुढील बैठकीपूर्वी अहवाल सादर करावा असेही त्यांनी निर्देशित केले. 

        जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याअंतर्गत एकूण 50 आरोपींवर खटले सुरू आहेत.24 डिसेंबर 2025 रोजी दाखल गुन्ह्यात 15 आरोपींवर कारवाई झाली असून 12 जणांना अटक व 3 आरोपींचा शोध सुरू आहे.07 जानेवारी 2026 रोजी बेकायदेशीर सोनोग्राफी मशीनसह आरोपी पकडण्यात आला.सोनोग्राफी केंद्रेसोलापूर ग्रामीण कार्यक्षेत्रात 243 सोनोग्राफी व 102 एमटीपी केंद्रे नोंदणीकृत आहेत.ऑनलाईन एफ फॉर्म प्रणाली सर्व केंद्रांमध्ये सुरू असून त्रैमासिक तपासणी व ऑडिट केले जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ डोईफोडे यांनी दिली. लिंग गुणोत्तर स्थितीसन 2017 मध्ये लिंग गुणोत्तर 885 होते, तर 2024 मध्ये ते 931 पर्यंत सुधारले.2024 मध्ये जन्मावेळी लिंग गुणोत्तर 931 नोंदले गेले असून, पंढरपूर (946), करमाळा (943), बार्शी (941) यांसारख्या तालुक्यांमध्ये सुधारणा दिसून आली.एप्रिल 2025 ते मार्च 2026 दरम्यान 0 ते 6 वर्षे वयोगटात एकूण लिंग गुणोत्तर 957 इतके आहे, असे डॉ. डोईफोडे यांनी सांगितले.

 यावेळी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम तसेच एचआयव्ही आणि एड्स कार्यक्रमाचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम:- सोलापूर जिल्हा रुग्णालयात ९ जून २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय बैठकीत एप्रिल २०२५ ते मे २०२६ दरम्यान ५०४ आरोग्य संस्था व १६९१ शाळा तंबाखूमुक्त घोषित झाल्या, २४,८९१ रुग्णांची नोंदणी झाली व त्यापैकी २१८ रुग्णांनी तंबाखूजन्य पदार्थांचा त्याग केला. कोटपा कायदा २००३ अंतर्गत १,६२४ लोकांवर कारवाई करून ₹२,९४,१३५ दंड वसूल करण्यात आला. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मौखिक आरोग्य तपासणी, स्वाक्षरी मोहिम, चित्रकला स्पर्धा, संगीत थेरपी, महाराजस्व अभियान, कृषी प्रदर्शन, आषाढी वारीतील जनजागृती स्टॉल, तसेच “जागर व्यसनमुक्तीचा” उपक्रमांतर्गत संभळ वादन यांसारखे विविध उपक्रम राबवून जनतेमध्ये तंबाखू सेवनाविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते मार्च या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील मैत्री क्लिनिकमध्ये एकूण १९७२ किशोरवयीन मुला-मुलींनी नोंदणी करून समुपदेशन घेतले. उद्दिष्ट २२०० असून साध्य ८९.६३ टक्के झाले आहे.

जिल्ह्यातील एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत एव्हीटीएचएस (EVTHS) अंतर्गत मातृ-आरोग्य व एचआयव्ही तपासणीसंदर्भातील कामगिरी समाधानकारक ठरली आहे.

Previous Post

दमाणी नगरमध्ये १० जूनपासून पंचदिनी भव्य कीर्तन महोत्सव

Next Post

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026