• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2026
in Blog
0
सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर – पुणे येथे मिथेनॉल मिश्रित विषारी मद्यप्राशनामुळे झालेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, गावठी दारू विक्री तसेच मिथेनॉलसारख्या विषारी रसायनांच्या गैरवापराविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी संयुक्त व प्राधान्यक्रमाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मिथेनॉल हे रसायन इथेनॉलशी साधर्म्य दाखवत असले तरी अत्यंत विषारी असून सेवनामुळे कायमस्वरूपी अंधत्व, कोमामध्ये जाणे, मूत्रपिंड निकामी होणे व मृत्यूदेखील संभवतो, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अवैध मद्य, रसायनयुक्त दारू तसेच ढाबे, टपऱ्या किंवा विनापरवाना विक्री करणाऱ्या ठिकाणांवरील मद्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांनुसार सोलापूर महानगरपालिका, सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमार्फत घंटागाड्यांच्या माध्यमातून ध्वनीफीत प्रसारित करून विषारी मद्याचे दुष्परिणाम व अवैध मद्यनिर्मितीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.

अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या अधिकृत किंवा अनधिकृत वीजजोडण्या तातडीने खंडित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने संयुक्त कारवाई करून अवैध वीजपुरवठा कायमस्वूपी बंद करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मिथेनॉल विषय अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारित असल्याने मिथेनॉलचे उत्पादन, खरेदी, विक्री, साठवणूक व वितरण करणाऱ्या आस्थापनांची माहिती संकलित करून त्यावर विशेष देखरेख ठेवण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. संशयास्पद व्यवहार किंवा बेकायदेशीर वापर आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील हातभट्ट्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा काळा गूळ व इंधनासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गूळ खरेदी करणाऱ्यांच्या व्यवहारांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून अवैध मद्यनिर्मितीसाठी वापर होणार नाही यासाठी दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधितांवर सोपवण्यात आली आहे.

पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात संयुक्त धडक कारवाया सुरू असून त्या अधिक तीव्र करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 मधील कलम 133 व 134 नुसार अवैध मद्यनिर्मिती व विक्री रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या कामात निष्काळजीपणा आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दिनांक 2 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार आज भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर कार्यालयात दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली. यावेळी गावपातळीवर हातभट्टी दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक व विक्रीबाबतची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले.*

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 29 मे 2026 ते 2 जून 2026 या कालावधीत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवून 46 हजार 275 लिटर रसायन, 3 हजार 717 लिटर हातभट्टी दारू, 54.75 बल्क लिटर देशी दारू व 125 बल्क लिटर ताडी जप्त केली. या कारवाईत 72 गुन्हे नोंदवून 58 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून 3 वाहनांसह सुमारे 24 लाख 72 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा विषारी रसायनांच्या गैरवापराबाबत कोणतीही माहिती नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस विभागास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. नागरिकांच्या जीविताशी संबंधित अशा गुन्ह्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबिण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी सांगितले आहे.

Previous Post

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

Next Post

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के 'बैल-मुक्त' प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026