• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

Yes News Marathi by Yes News Marathi
May 25, 2026
in मुख्य बातमी
0
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
0
SHARES
41
VIEWS

भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज,
दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई

पंढरपूर : अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान व श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने पंढरीत येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन रांग व मंदिर परिसरात शेडनेट उभारुन सावली तयार करण्यात आली आहे. तर दर्शन रांगही वॉटरप्रूफ बनविण्यात आली आहे. यामुळे दर्शन रांगेत तासनतास थांबून भाविक दर्शन घेत आहेत. भाविकांना सुलभ, जलद व शांततेत दर्शन मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मंदिर प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. त्यानुसार व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत. दि.17 मे ते 15 जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी दर्शन रांगेंमध्ये मोठी गर्दी होत आहे. भाविकांना सुलभ, जलद व शांततेत दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार दर्शन रांगांचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश पोलीस प्रशासन व मंदिर प्रशासनास दिले आहेत. कोणत्याही भाविकास अन्य मार्गाने किंवा नियमबाह्य पद्धतीने दर्शन देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. काही इसमांकडून दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करून गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच व्हिआयपी दर्शनामूळे दर्शन रांगेतील भाविकांना वेळ लागत असल्याने तेही बंद करण्यात आले आहे.

दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणारे, नियमांचे उल्लंघन करणारे अथवा भाविकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या समन्वयातून भाविकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व सुलभ दर्शन मिळण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

दर्शनाची वेळ पाहूनच रांगेत उभे रहावे
आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणे अधिक मास कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन 24 तास उपलब्ध नसते. अधिक मास कालावधीत दररोज सकाळी 6.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत दर्शन व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच दर्शन रांगेचे प्रवेशद्वार रात्री 10.00 वाजता बंद करण्यात येत आहे. रात्री 12.00 ते पहाटे 4.00 या कालावधीत श्रींची विश्रांती असते. तसेच पहाटे 4.00 ते 5.00 या वेळेत काकड आरती व नित्य पूजा होत असल्यामुळे या कालावधीत दर्शन बंद राहते.तथापि, दर्शन बंद झाल्यानंतरही अनेक भाविक दर्शन रांगेत उभे राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. पहाटे 5.00 वाजता पुन्हा दर्शनास सुरुवात होत असल्याने सर्व भाविकांनी दर्शनाच्या वेळेची माहिती घेऊनच दर्शन रांगेत प्रवेश करावा, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

Previous Post

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान; त्यांचे विचार तळागाळात पोहोचवा – आमदार कल्याणशेट्टी

Next Post

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

Related Posts

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!
मुख्य बातमी

TOP 25 । उजनीची पाणी पातळी गेल्या वर्षीपेक्षा देखील खाली…!

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!
मुख्य बातमी

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026
TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!
मुख्य बातमी

TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

May 24, 2026
TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । खरंच पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर सोलापूरची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ?

May 23, 2026
Next Post
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…

May 25, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026