सोलापूर – मंत्री ग्रामविकास व पंचायतराज महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार दि. २२ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह नियोजन भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीची विषयसूची पुढीलप्रमाणे :-
बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीचा इतिवृत्तांत व त्यावरील कार्यवाही अहवालास मान्यता देणे.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेच्या दि. ३१ मार्च २०२६ अखेरच्या खर्चास मान्यता देणे.
तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ च्या कामांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे.आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने आयत्या वेळेचे विषयही चर्चेस घेण्यात येणार आहेत.
सदर बैठकीस संबंधित अधिकारी व सदस्यांनी परिपूर्ण माहितीसह स्वतः उपस्थित रहावे. प्रतिनिधी पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन यांनी केले आहे.











